Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनगरवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार

गणेशनगर/प्रतिनिधी ः राहाता तालुक्यातील धनगरवाडी गावठाण शेजारी अहिल्यादेवी नगर गट नंबर 28 येथे राहणारे भाऊसाहेब नानासाहेब साखरे यांच्या घराशेजारी

दैनिक लोकमंथन lफोन टॅपिंगचा अहवाल मलिक यांनी फोडलाः फडणवीस*
तात्काळ पंचनामे करुन शेतकर्‍यांना मदत जाहीर करा
बेलापूर गावात डास प्रतिबंधक फवारणीस सुरुवात

गणेशनगर/प्रतिनिधी ः राहाता तालुक्यातील धनगरवाडी गावठाण शेजारी अहिल्यादेवी नगर गट नंबर 28 येथे राहणारे भाऊसाहेब नानासाहेब साखरे यांच्या घराशेजारी दोन शेळ्यावर व एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यात एक शेळी मरण पावली. एक शेळी व कुत्रा जखमी झाले.जखमी शेळीवर वाकडी येथील पशुधन अधिकारी श्रेणी एक डॉक्टर मेहत्रे यांना फोन करून कळवण्यात आले. मृत शेळीची पोस्टमार्टम केली. जखमी शेळीवर उपचार करण्यात आले. बिबट्याने पहाटे तीनच्या दरम्यान हल्ला केला. त्यानंतर वन अधिकारी के डी सानप, वन कर्मचारी जी बी सुराशे यांनी सकाळी येऊन पंचनामा केला. पंच म्हणून धनगरवाडीचे माजी सरपंच राजू नामदेव रक्टे, शिवाजी राशिनकर, विष्णू बाबुराव राशिनकर, नाना साखरे ,अमोल साखरे, सागर साखरे इत्यादींनी पिंजरा लावण्याची मागणी केली.

COMMENTS