अहमदनगर/प्रतिनीधी रस्त्याने पायी जाणार्या 27 वर्षीय तरुणीला आडवून तिचा हात धरुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्याची
अहमदनगर/प्रतिनीधी रस्त्याने पायी जाणार्या 27 वर्षीय तरुणीला आडवून तिचा हात धरुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्याची घटना नालेगाव परिसरातील गाडगीळ पटांगण जवळ घडली. बीड जिल्ह्यातील 27 वर्षीय तरुणी कामानिमित्त नगर शहरात भाडेतत्वावर खोली घेऊन राहते. ती कामाकरिता शहरातील स्टेशनरी दुकानांत कामाला जाते सुमारे सहा महिन्यापुर्वी सचिन क्षेत्रे (रा. दिल्लीगेट, अहमदनगर ) याचेशी ओळख झाली. पंरतु तेंव्हापासुन तो तिचा नेहमी पाठलाग करुन तिची इच्छा नसताना तिला त्याचे सोबत राहा असे म्हणून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. त्याबाबत तिने त्याला यापुर्वी वारंवार समजावुन सांगितले.
26 रोजी नेहमीप्रमाणे ती तरुणी तिचे कामावर जाण्यासाठी घरुन निघाली असता. गाडगीळ पटांगण, नालेगाव, येथे आली असता. सचिन क्षेत्रे हा तेथे आला व तिला म्हणाला की मला तुझ्याशी बोलायचे आहे. तेंव्हा तिने त्याला मला तुझ्याशी काही बोलायचे नाही असे म्हणाले असता त्याने लागलीच तिचा हात धरुन त्याचे जवळ ओढले व तिला म्हणाला की तु माझ्या सोबत राहा नाहीतर तुला जिवे मारुन टाकील असे म्हणाला त्यावेळी तिने त्याच्या हातातुन निसटण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्या डोळ्याजवळ हाताने बुक्की मारली व तिला लाथा बुक्क्याने मारहाण केली. तेंव्हा तिने आरडाओरडा केला असता तेथे जाणारे येणारे लोक जमा झाले असता तो तेथुन पळुन गेला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून सचिन क्षेत्रे (रा.दिल्लीगेट, अहमदनगर) याचेविरुध्द गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलिस नाईक शेख हे करीत आहेत.
COMMENTS