Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजधानीत डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये एका डॉक्टरची हत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. दिल्लीतील कालिंदी कुंज येथील जैतपूर भागातील नीमा हॉस्पिटलमध्ये एका

वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात | LOKNews24
अर्जुनराम मेघवाल नवे कायदामंत्री
एमआयएम पक्षाची परळी शहर कार्यकारणी जाहीर

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये एका डॉक्टरची हत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. दिल्लीतील कालिंदी कुंज येथील जैतपूर भागातील नीमा हॉस्पिटलमध्ये एका 55 वर्षीय डॉक्टरची दोन अल्पवयीन मुलांनी गोळ्या झाडून हत्या केली. युनानी डॉक्टर जावेद अख्तर असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले. त्यांचा शोध घेतला जात आहे. रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींचे वय 16 ते 17 वर्षांच्या दरम्यान आहे. एका आरोपीवर 1 ऑक्टोबर रोजी पायाच्या मोठ्या दुखापतीवर उपचार करण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा तो एका मुलाला घेऊन रुग्णालयात पोहोचला. आरोपीने अंगठ्याचे ड्रेसिंग बदलण्यास सांगितले. ड्रेसिंग झाल्यानंतर, अल्पवयीनांनी सांगितले की त्यांना प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता आहे. त्यांनी डॉक्टर जावेद यांना भेटायला सांगितले आणि अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. काही मिनिटांनी रुग्णालयातील कर्मचारी गझला परवीन आणि मोहम्मद. कामिलला बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. ते डॉक्टरांच्या केबिनमध्ये पोहोचले आणि जावेद अख्तरच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे त्यांनी पाहिले.

COMMENTS