Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जी-20 परिषदेच्या शिष्टमंडळाची छत्रपती संभाजी नगर च्या लेणीला भेट

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - जी-20 परिषदेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी शहरातील प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेल्या औरंगाबाद लेणी आणि बीबीका मकबर्‍य

‘महाज्योतीचे’ कार्यालय मराठवाड्यातील भटक्या विमुक्त व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी साहयभूत – मंत्री विजय वडेट्टीवार
 औद्योगिक नगरीत हायवाखाली चिरडून एका दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू
भाजपने केला शिवसेनेच्या 18 जागांवर दावा

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – जी-20 परिषदेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी शहरातील प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेल्या औरंगाबाद लेणी आणि बीबीका मकबर्‍याला भेट दिली. शिष्टमंडळात असणार्‍या सर्व विदेशी महिला पाहुण्या हा वारसा पाहून अक्षरशः भारावून गेल्या. शिष्टमंडळ औरंगाबाद लेणीला भेट देणार असल्या कारणाने संपूर्ण लेणी परिसर हा सुशोभिकरणामुळे अधिकच सुंदर दिसत होता. तर लेणीकडे जाणार्‍या रस्त्याच्या दोन्ही बाजूने छान रांगोळी काढल्यामुळे रस्त्याचे सौंदर्य खुलले होते.

तीन वातानुकूलित बसेसमधून सकाळीच लेणीच्या पायथ्याशी महिला पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर नऊवारी नेसलेल्या तरुणींनी त्यांच्यावर फुलांची उधळण करून त्यांना गुलाब पुष्प भेट दिले. लेणीपर्यंत जाण्यासाठी लाल कार्पेट अंथरलेले होते. पुरातत्व विभाग, जिल्हा व महानगरपालिका प्रशासनातील अधिकार्‍यांनीही त्यांचे स्वागत केले. मुख्य लेणीच्या परिसरात आल्यानंतर  लेणीचे सौंदर्य पाहून सर्व महिला थक्क झाल्या. यावेळी उपस्थित गाईडने प्राचीन लेणीच्या प्रत्येक भागाची इंतभूत माहिती पाहुण्यांना दिली. हा प्राचीन वारसा पहिल्यानंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले. औरंगाबादच्या लेण्यांचा समूह हा आसपासच्या जमिनीपासून 70 फूट उंचीवर असलेल्या दख्खन पठारामध्ये कोरलेल्या आहेत. येथे बौध्द धर्माला समर्पित एकूण 12 लेणी आहेत ज्या तीन स्वतंत्र गटामध्ये विभाजित आहेत. पहिल्या गटात 1 ते 5 पर्यंत दुसर्‍या गटात 6 ते 9 आणि तिसर्‍या गटात 10 ते 12 लेणी आहेत. या लेण्या सुमारे तिसर्‍या ते सातव्या शतकात निर्माण केलेल्या आहेत. औरंगाबाद लेणी पहिल्यानंतर शिष्टमंडळाने जवळच असणार्‍या बीबी का मकबर्‍याला भेट दिली. या ठिकाणी त्यांचे स्वागत तुतारी व सनई चौघडयाच्या वादनाने अतिशय उत्साहात करण्यात आले. त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. औरंगाबाद शहराच्या सौंदर्यात भर घालणारा बीबी का मकबरा पाहताना पाहुण्यांनी यावेळी आश्‍चर्य व्यक्त केले.

COMMENTS