Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तब्बल तीन वर्षांनंतर महिलेच्या खूनप्रकरणी गुन्हा

पुणे ः पुणे शहरातील पर्वती टेकडीचे वरील बाजुस जंगलात पडक्या पाण्याच्या टाकीजवळ तब्बल तीन वर्षापूर्वी पोलिसांना एका 35 ते 40 वयोगटातील महिलेचा खून

ऐन रमजानमध्ये घरखर्चास पैसे न दिल्याने पत्नीचे पतीवर चाकूने वार
जन्मदात्या आईला खांबाला बांधून मारहाण
पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’चा थरार, कोयत्याने वार करत तरुणाची हत्या

पुणे ः पुणे शहरातील पर्वती टेकडीचे वरील बाजुस जंगलात पडक्या पाण्याच्या टाकीजवळ तब्बल तीन वर्षापूर्वी पोलिसांना एका 35 ते 40 वयोगटातील महिलेचा खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आला होता. याप्रकरणी त्यावेळी अक्समात मयतचा गुन्हा दाखल करण्यात आला परंतु तीन वर्षानंतर याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा पर्वती पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत पर्वती पोलिसस्टेशनचे पोलिसनिरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांनी अज्ञात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती टेकडीच्या जंगलात पोलिसांना 17 ऑगस्ट 2020 रोजी पाण्याचे टाकीजवळ अनोळखी महिलेचा मृतदेह मिळून आलेला होता. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन तिच्या डोक्यात व छातीत कठीण वस्तुने आघात करुन तिला गंभीर जखमी करुन तिचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात सांगण्यात आले आहे. सदर महिलेच्या हातावर ‘सुरेखा’ या नावाने गोंदवण्यात आलेले आहे. मात्र, तिचा खून नेमका कोणी केला, कोणत्या कारणास्तव केला, तिची खरी ओळख काय आहे याबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. याप्रकरणी पोलिसांनी अक्समात मयत गुन्हयात सीआरपीसी कलम 174 प्रमाणे चौकशीत खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पर्वती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे करत आहे. कोथरुड परिसरात राहणार्‍या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस एका ओळखीच्या तरुणाने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशीच लग्न करणार आहे’ असे म्हणून तिला राहते घरी आणून तिच्या संमती शिवाय जबरदस्तीने तिच्याशी शारिरिक संबंध करुन तिला गरोदर केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच मुलीला सदर प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुझ्या घरच्यांना सोडणार नाही अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात पिडितेने तक्रार दाखल केल्यानंतर, संतोष कोकरे (वय-20) या आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

COMMENTS