यती नरसिंहानंद सरस्वतीविरोधात नगरमध्ये अखेर गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यती नरसिंहानंद सरस्वतीविरोधात नगरमध्ये अखेर गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करणारे यती नरसिंहानंद सरस्वती यांच्याविरोधात अहमदनगरम

शाहीर एकनाथ सरोदे यांना राष्ट्रीय साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार
अश्‍लील मजकुराच्या चिठ्ठ्या घरात टाकून महिलेचा विनयभंग
स्वातंत्र्यसेनानी बा. ह. नाईकवाडी यांची जयंती उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करणारे यती नरसिंहानंद सरस्वती यांच्याविरोधात अहमदनगरमध्ये अखेर गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार आर्किटेक्ट अर्शद शेख, कम्युनिस्ट पक्षाचे बहिरनाथ वाकळे व मनपा कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दाखल केलेल्या या तक्रारीची दखल घेत तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दि.17 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा ही एफ.आय.आर नोंदवून घेतली. यु-ट्युबवरील आक्षेपार्ह व्हीडीओआधारे राष्ट्रीय पातळीवर धर्मांध व्यक्तीविरोधात नोंद झालेला जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
यु-ट्युबवरील आक्षेपाहर्र् व्हीडीओ प्रकरणी यती नरसिंहानंद सरस्वतीविरुद्ध गुन्हा नोंदवावा, असे आदेश अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. तक्रारदारांनी आधी पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी त्याची दखल घेतली नसल्याने त्यांनी प्रसिद्ध वकील अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या माध्यमातून न्यायालयात खासगी दावा दाखल केला. या दाव्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने तक्रारदारांच्या बाजूने निकाल देत, संबंधित तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला आहे.
यती नरसिंहानंद सरस्वती यांनी एका व्हीडीओमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्याविषयी आक्षेपार्ह भाष्य करताना त्यांना जिहादी संबोधले होते व त्यांचे संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा केला होता तसेच मुस्लिम समाजाबद्दलही आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेख, वाकळे व लोखंडे यांनी केली होती. पण पोलिसांनी त्याची दखल घेतली नसल्याने त्यांनी यती नरसिंहानंद सरस्वतीविरोधात 23 जुलै 2021 रोजी अ‍ॅड. सरोदे यांच्यामार्फत खासगी फौजदारी तक्रार न्यायालयात दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी टी. एम. निराळे यांनी फौजदारी प्रक्रियेच्या संहिता 156 (3) नुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. या खटल्यात अ‍ॅड. सरोदे यांच्यासह त्यांचे सहकारी अ‍ॅड. मदन कुर्हे, अ‍ॅड. अजित देशपांडे, अ‍ॅड. अक्षय देसाई, अ‍ॅड. तृणाल टोणपे, अ‍ॅड. सुनयना मुंडे, नालंदा आचार्य, अभिजित पाटील, अस्मा क्षीरसागर, सिद्धी जागडे, ऋषिकेश शिंदे, मेखला गांगुर्डे यांनी या प्रकरणासंदर्भातील रिसर्चसाठी महत्वाचे काम केले. या व्यतिरिक्त अ‍ॅड. शेख फारुख बिलाल, अ‍ॅड. शेख इरफान व अ‍ॅड. शेख साकिब यांनीही सहकार्य केले. त्यामुळे या निकालानुसार येथील तोफखाना पोलिसांनी नरसिंहानंद सरस्वतीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 153(अ), कलम 153(ब), कलम 295(अ) व कलम 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांना तीन पर्याय
आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याने आता यती नरसिंहानंद सरस्वतींसमोर तीन कायदेशीर पर्याय आहेत. त्यांना एकतर अहमदनगर न्यायालयातून जामीन घ्यावा लागेल किंवा पोलिसांना त्यांना अटक करून अहमदनगरला आणावे लागेल. तसेच ते एफ.आय.आर नोंदविण्याच्या प्रक्रियेला उच्च न्यायायालयात आव्हानसुद्धा देऊ शकतात असे अ‍ॅड. सरोदे म्हणाले.

अशा प्रकारांना चाप बसेल
देशाच्या एकतेवर, अखंडतेवर आणि बंधुत्वतेवर आघात करणारी वक्तव्ये करणार्‍या यती नरसिंहानंद सरस्वतीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले. यती नरसिंहनंद सरस्वतीसारख्या मानसिकता असणार्‍या लोकांना धर्म संसदेसारख्या विध्वंसक विचाराच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास पाठबळ मिळत असले तरी न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे आणि तोफखाना पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याबाबत घेण्यात आलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे द्वेषमूलक वक्तव्य करणार्‍यांवर नक्कीच चाप बसेल, असे मत तक्रारदारांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS