Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई ः ठाणे जिल्ह्यातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर याप्रकरणी आमदार गणप

श्रीरामपुरात बिबट्याचा तरुणांवर हल्ला ….
बीसीसीआयकडून मोहम्मद शमी याची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
मुख्यमंत्रिपदावरून मविआत रस्सीखेच

मुंबई ः ठाणे जिल्ह्यातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहे. महेश गायकवाड यांच्याविरोधात कल्याणमधील बांधकाम व्यावसायिकाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर विकसित करण्यात येत असलेल्या जागेत बेकायदा घुसून नुकसान केल्याचा आरोप एका बांधकाम व्यावसायिकाने केला आहे.

याप्रकरणी त्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे शुक्रवारी हिललाईन पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड, त्यांचे समर्थक आणि द्वारलीतील इतर 70 ग्रामस्थांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती, परंतु गोळीबाराच्या घटनेनंतर रविवारी या दाखल गुन्ह्याचे प्रकरण बाहेर आले. कल्याण पश्‍चिमेतील बांधकाम व्यावसायिक जितेंद्र रामअवतार पारीख (37) याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, जितेंद्र रामअवतार पारीख हे व्हर्टेक्स स्काय व्हिला या बांधकाम कंपनीचे संचालक आहेत. कल्याण पश्‍चिमेतील वायलेनगर भागात ही कंपनी असून आमदार गणपत गायकवाड  या बांधकाम कंपनीशी संबंधित आहे, असेही सांगण्यात येत आहे. या प्रकरणात शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, अक्षय दिनेश गायकवाड, राहुल पाटील, किरण फुलोरे, एकनाथ जाधव, सुनील जाधव आणि इतर 70 लोक यांचा समावेश आहे.आरोपींमध्ये तीन महिलांचाही समावेश करण्यात आला आहे.

COMMENTS