Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेला मारहाण केल्या प्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल

अहमदनगर : क्षुल्लक कारणावरुन मनात राग धरून पाच जणांनी महिलेला मारहाण केल्याची घटना भिंगार च्या सौरभनगर मध्ये घडली.  या बाबतची माहिती अशी की मनीषा

मैत्रिणींचे फोटो प्रियकरास पाठवणार्‍या तरूणीवर गुन्हा
महिलेचा विनयभंग तरी गुन्ह्यात नोंद नाही
मुलीला जमिनीच्या वादातून जिवंत गाडण्याचा प्रयत्न

अहमदनगर : क्षुल्लक कारणावरुन मनात राग धरून पाच जणांनी महिलेला मारहाण केल्याची घटना भिंगार च्या सौरभनगर मध्ये घडली.  या बाबतची माहिती अशी की मनीषा मोरे (वय २७) या त्यांच्या घरी असताना  निर्मला शिवाजी मोरे, साक्षी शिवाजी मोरे, श्रुतिका शिवाजी मोरे, शकुंतला सोमनाथ मोरे, राजु सोमनाथ मोरे (सर्व रा. सौरभनगर, भिंगार) हे त्यांच्या घरी आले. मनीषा मोरे या त्यांच्या घरी असताना निर्मला मोरे व इतरांनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी मनीषा मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार आर.के.दहिफळे करत आहेत.

COMMENTS