Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परप्रांतीयांना डांबून ठेवल्याप्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल

जत / प्रतिनिधी : जाडरबोबलाद येथे आम्ही सांगितलेल्या गायी न आणता वेगळ्याच गायी का आणल्या? अशी विचारणा करत हरियाणा येथील एका चालकासह कामगाराला 8 दिवस ब

कराड-विटा मार्गावर दुचाकीच्या स्फोटाने खळबळ
शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परिक्षा होणार ऑफलाईन एमसीक्यू ?
पाच लाखांची लाच घेताना ’ग्रामसेवक’ लाचलुचपतच्या जाळ्यात

जत / प्रतिनिधी : जाडरबोबलाद येथे आम्ही सांगितलेल्या गायी न आणता वेगळ्याच गायी का आणल्या? अशी विचारणा करत हरियाणा येथील एका चालकासह कामगाराला 8 दिवस बेकायदेशीररित्या डांबून ठेवून दमदाटी व मारहाण केल्याचा प्रकार घडला. अनिल राजवीर पांचाळ (वय 37) व आकाश बलवीर (रा. कुंजपुरा, ता. बसंती, हरियाणा) असे डांबून ठेवलेल्या चालक व कामगाराचे नाव आहे. बेकायदेशीर वाहन चालकासह कामगाराला डाबून ठेवल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते महादेव रामाना अंकलगी व जितेंद्र महादेव अंकलगी या पिता-पुत्रावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत अनिल पांचाळ यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव अंकलगी यांनी हरियाणा येथील व्यापार्‍यांशी मोबाईलवरून गायी खरेदीचा व्यवहार ठरवला. त्यानुसार संबंधित व्यापार्‍याने एका ट्रान्सपोर्टमध्ये ठरल्याप्रमाणे वाहनात गाई भरून दिल्या. सोबत एक कामगारही पाठवला. दरम्यान, संबंधित व्यापार्‍याने हरियाणातून 20 ऑक्टोंबर रोजी गाई भरून टेम्पो जाडरबोबलाद येथे आणला होता. यापूर्वी दाखवलेल्या गायी यामध्ये नाहीत. नऊ गायी बदलून आणल्या असल्याचे म्हणणे अंकलगी यांचे होते.
20 ऑक्टोंबरपासून चालक अनिल पांचाळ व आकाश बलवीर या दोघांना अंकलगी पिता-पुत्राने मारहाण करत डांबून ठेवले. घरातील कामे करण्यास भाग पाडले. यावेळी अनिल पांचाळ यांनी एका व्यक्तीच्या मोबाईलवरून पोलीस हेल्पलाईनला संपर्क साधला. यानंतर उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांची सुटका केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS