Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंजली भारतीविरुद्ध गुन्हा दाखल

भंडारा : भंडारा तालुक्यातील फुलमोगरा येथे 14 जानेवारी रोजी आयोजित भीमगीत कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायिका अंजली भारती यांनी केलेल्या कथित आक्षेपा

थ्री इडियट्स’ चा सिक्वेल येणार ?
लोकलच्या गर्दीतून १७ वर्षीय मुलीचं ‘फिल्मी’ स्टाईल अपहरण
ऐतिहासिक भिडे वाडा जमीनदोस्त

भंडारा : भंडारा तालुक्यातील फुलमोगरा येथे 14 जानेवारी रोजी आयोजित भीमगीत कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध गायिका अंजली भारती यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत प्रक्षोभक आणि बदनामीकारक भाषा वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यक्रमात भाषण करताना अंजली भारती यांनी राज्यातील महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींच्या कुटुंबीयांविषयी अपमानास्पद उल्लेख केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकारामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
भाजप महिला आघाडीच्या भंडारा जिल्हाध्यक्ष माहेश्‍वरी हेमराज नेवारे यांनी याबाबत अधिकृत तक्रार दाखल केली असून, केवळ गायिकेविरुद्धच नव्हे तर कार्यक्रमाचे आयोजक संदेश ज्ञानेश्‍वर वासनिक तसेच इतर संबंधितांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीच्या आधारे जवाहरनगर पोलिसांनी भारतीय दंड संहितेतील कलम 79, 223, 356 (2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 67 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा सायबर पोलिस स्टेशनकडून करण्यात येत आहे. दरम्यान, सार्वजनिक व्यासपीठावरून केले जाणारे वक्तव्य सामाजिक जबाबदारीच्या चौकटीत असावे, अशी चर्चा या घटनेनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

COMMENTS