Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निंबोडीजवळ गाडीची झाडाला धडक

आईसह मुलीचा मृत्यू, तीन जखमी

अहमदनगर प्रतिनिधी - चारचाकी वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार लिंबाच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात माय-लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची

बुलढाण्यात भरधाव कारच्या धडकेत तीन महिला ठार
स्कूल बस आणि गाडीचा अपघात.
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

अहमदनगर प्रतिनिधी – चारचाकी वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार लिंबाच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात माय-लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (3 डिसेंबर) सायंकाळी नगर-जामखेड रोडवरील निंबोडी (ता. नगर) शिवारात घडली. या अपघातात कारमधील अन्य तिघे जखमी झाले आहेत. विनिता दीपक उघडे (26) व मुलगी रास्वी दीपक उघडे (वय दीड वर्ष, दोघी रा. मुलुंड, ठाणे) अशी मृत मायलेकीची नावे आहेत. तर कार चालक दीपक सुधाकर उघडे (वय 33, रा. मुलुंड ठाणे), प्रथमेश रामचंद्र कनोजिया (वय 31, रा. खडकी, पुणे) व एक अनोळखी मुलगी जखमी झाले आहेत.  या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक उघडे हे कुटुंबासह बीड येथून नगर-जामखेड रस्त्याने मुंबईकडे जात होते. ते नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात आल्यावर त्यांचा कारवरील ताबा सुटून वेगात असलेली कार लिंबाच्या झाडाला जाऊन आदळली. या अपघातात त्यांची पत्नी व मुलगी जागीच मरण पावले तर त्यांच्यासह अन्य दोनजण जखमी झाले. हा अपघात एवढा मोठा होता की,त्याच्या आवाजाने आजूबाजूचे नागरिक तात्काळ या ठिकाणी जमा झाले. मार्गावरून जाणार्‍या-येणार्‍या अनेक गाड्या या ठिकाणी थांबल्या होत्या. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना कळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केले. घटनेची माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किरण साळुंखे करीत आहेत.

उघडे परिवार मुंबईत स्थायिक असून कामानिमित्ताने बीडला सर्वजण गेले होते. तेथून पुन्हा मुंबईकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. नगर तालुक्यातील निंबोडी या गावात आल्यावर त्यांचे कारवरील (क्रमांक एमएच 04 एचएम 7392) नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर आदळली. जखमींवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून यातील एकाची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिस अंमलदार अमोल आव्हाड यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी दीपक सुधाकर उघडे (वय 30 वर्षे, राहणार मुलुंड ईस्ट, म्हाडा कॉलनी, हरिओम नगर, जिल्हा ठाणे) याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS