Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीतील व्यापार्‍याला 23 लाख रूपयांना घातला गंडा

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः विविध कंपनीच्या इन्शुरन्स पॉलीसीमार्फत तूम्हाला व्यवसायासाठी दीडकोटी रुपये कर्ज मिळवून देतो. असे बोल बच्चन करुन राहुरी

 पैसे दुप्पट करून देण्याच्या आमिषातून 21 लाख 24 हजारांची फसवणूक
‘मी अध्यक्ष’ असल्याची थाप मारत भामट्याने चक्क विकली शाळा.
पोलिसांच्या 2 पेट्रोल पंपावर 20 लाखाची फसवणूक

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः विविध कंपनीच्या इन्शुरन्स पॉलीसीमार्फत तूम्हाला व्यवसायासाठी दीडकोटी रुपये कर्ज मिळवून देतो. असे बोल बच्चन करुन राहुरी येथील एका व्यापार्‍याला सुमारे 23 लाख रुपयांना गंडा घातला. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या व्यापार्‍याने फसवणूक करणार्‍या 14 जणांवर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली.
         अशपाक आब्बास तांबोळी, वय 50 वर्षे, रा. सोनगाव, ता. राहुरी. हे सोनगाव येथे गोळी, बिस्कीटचे दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता होती. 10 एप्रिल 2022 ते 20 मार्च 2023 या दरम्यान अंधेरी वेस्ट येथील काही भामट्यांनी अशपाक तांबोळी यांना वेळोवेळी फोन करून तुम्हाला विविध कंपनीच्या इन्शुरन्स पॉलीसी मॉर्गेज करून त्यावर व्यवसायासाठी झीरो टक्के व्याज दराने दीड करोड रुपये कर्ज देतो. असे बोल बच्चन केले. त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून अशपाक तांबोळी यांनी वेळोवेळी 22 लाख 86 हजार 550 रुपयांच्या स्टार युनियन, अविवा इन्शुरन्स, मॅक्स लाईफ इन्शुरन्स, बजाज अलेंझ इंश्युरंन्स, एचडीएफसी लाईफ इंश्युरंन्स, फ्युचर जनरल मेडिक्लेम इंश्युरंन्स, रिलायन्स मेडीकल हेल्थ इंश्युरंन्स, स्टार युरेका इंश्युरन्स अशा विविध 19 कंपनीच्या पॉलीसी काढल्या. सदर पॉलीसी काढणे करीता अशपाक तांबोळी यांनी 22 लाख 86 हजार 550 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यातून पाठवीले. त्यानंतर अशपाक तांबोळी यांनी सदर पॉलीसीवर कर्ज मिळणे करीता सदर भामट्यांना वेळोवेळी फोन करुन चौकशी केली. तेव्हा भामट्यांनी आज कर्ज देतो, उद्या देतो. असे सांगुन तांबोळी यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, तसेच कोर्‍या कागदावर सह्या व्हाट्सप मोबाईलवर पाठविणेस सांगितल्या. त्याप्रमाणे तांबोळी यांनी सर्वकाही पाठवीले. त्यानंतर भामट्यांनी वेळोवेळी उडवा उडवीची उत्तरे देऊन कर्ज देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे अशपाक आब्बास तांबोळी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अपर्णा देशमुख, रा. 202 बी विंग, सागर टच प्लाझा, साकीनाका रोड, अंधेरी वेस्ट तसेच दिव्या मॅडम, पुजा जाधव, सोनिया मॅडम, निधी शर्मा, संदिप सिंग, नेहा मॅडम, जोशी मॅडम, तनुजा मॅडम, गणेश कांबळे, नम्रता मॅडम, पाटील गोरेगाव, संजीव कुमार व पूजा अशा 14 जणांवर गून्हा रजि. नं. 1026/2023 भादंवि कलम 420, 34 प्रमाणे फसवणूकीचा गून्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

COMMENTS