Homeताज्या बातम्याविदेश

मेक्सिकोत प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; २७ जणांचा मृत्यू..

मेक्सिको - मेक्सिकोमध्ये बस 80 फूट खोल दरीत कोसळून भीषण बस अपघात झाला आहे. या बस अपघातात 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, 19 जण जखमी झा

शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना तातडीने अटक करावी – एकनाथ शिंदे
कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना ईडीची नोटीस
कोतुळच्या ग्रामविकास अधिकार्‍याला धमकी

मेक्सिको – मेक्सिकोमध्ये बस 80 फूट खोल दरीत कोसळून भीषण बस अपघात झाला आहे. या बस अपघातात 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, 19 जण जखमी झाले आहेत. वृत्तानुसार, बुधवारी पहाटे दक्षिण मेक्सिकोमध्ये बस दरीत कोसळली. या अपघातात 27 लोक ठार आणि इतर 19 जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दक्षिणेकडील ओक्साका राज्यात बुधवारी हा भीषण अपघात झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकोच्या दक्षिणेकडील ओक्साका राज्यात बुधवारी प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. प्रांतीय वाहतूक पोलिसांनी ट्विट करत सांगितलं आहे की, बस मेक्सिको सिटीहून ओक्साका शहराकडे जात होती. मीडिया रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, 27 लोकांचा मृत्यू झाला आणि 19 जखमींना उपचारांसाठी प्रदेशातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. दरम्यान, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बस 80 फूट खोल दरीत कोसळून 27 जणांचा मृत्यू ओक्साकाच्या राज्यपाल सॉलोमन यांनी ट्विट करून अपघाताची माहिती दिली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. रहिवासी आणि पालिका कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी बचावकार्यात मदत केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक वर्षाचं बालक, 13 महिलांचा समावेश आहे.

COMMENTS