Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खर्ड्यात 78 वर्षीय वृद्धेवर अत्याचार

बलात्कार आणि अ‍ॅट्रोसिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल

जामखेड ः जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी जात असताना रस्त्यामध्ये 78 वर्षीय वृध्द महिलेवर बळजबरीने अत्याचार केला तसेच

केशकर्तनालय दुकानदारांना राज्यशासनाने आर्थिक मदत करावी : कोल्हे
१०० सायकलस्वार करणार पाच राज्ये व बांगलादेशातून ३००० किलोमीटरचा प्रवास
अकोले रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी माजी प्राचार्य सातपुते

जामखेड ः जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी जात असताना रस्त्यामध्ये 78 वर्षीय वृध्द महिलेवर बळजबरीने अत्याचार केला तसेच कोणाला सांगितले तर जीवे मारून ओढत नेऊन फेकून देईन अशी धमकी दिली. या संतापजनक घटनेप्रकरणी दयानंद सोमनाथ खाडे रा. बाळगव्हाण ता.जामखेड याच्याविरुध्द बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर पिडीत महिला करमाळा जिल्हा सोलापूर येथील आहे.
पिडीत 78 वर्षीय आदिवासी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पिडीत महिला 24 मार्च रोजी खर्डा गावची यात्रा असल्याने दुपारी 1:00 वाजे सुमारास खर्डा बस स्टँडवर उतरली व खर्डा येथून बाळगव्हाणला जाण्यासाठी गाडी न मिळाल्यामुळे डांबरी रोडने पायी चालत जात असताना खर्डा गावाच्या बाहेर गेल्यानंतर रोडवर तीला पायीच जात असताना एक इसम भेटला. सदर पिडीतेने बाळगव्हाण रस्ता विचारला असता मला पण बाळगव्हाणाला जायचे आहे. माझ्यामागे चला म्हणाला. एकमेकांची विचारपूस करतांना दयानंद खाडे असे नाव सांगत तुमच्या बहीणी शेजारीच माझे घर असल्याचे त्याने सांगितले. दुपारी 2 वाजे सुमारास बाळगव्हाण शिवार शेतातुन कच्चा रस्त्याने चालत असतांना महिलेच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत दयानंद खाडेने तिच्याशी बळजबरीने शाररीक संबंध निर्माण करून गळा धरून तु जर कोणाला काही सांगितले तर  तुला जीवे मारून ओढ्यात टाकुन देईन अशी धमकी देवून तेथून पळून गेला आहे. त्यानंतर सदर अत्याचारग्रस्त महिला बाळगव्हाण येथे आपल्या बहिणीच्या घरी गेली व तिला सर्व घडलेली हकीगत सांगितली. नंतर लगेच खर्डा पोलिस स्टेशनला आले असता पोलिसांनी उपचारासाठी दवाखाना यादी घेऊन ग्रामीण रुग्णालय जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठवला पाठविले. 25 मार्च रोजी सदर पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी दयानंद सोमनाथ खाडेविरुध्द बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आले आहे. सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे करत आहेत.

COMMENTS