Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारणा नदी काठी आढळली 6 फुटांची मगर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिराळा / प्रतिनिधी : चरण, ता. शिराळा गावाजवळ वारणा नदी काठी तब्बल सहा फुटांची एक मगर सापडली एवढी मोठी मगर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावर

येलूरमध्ये तीन सोसायट्यांच्यावर महाडिक गटाचा झेंडा
हुंबरळी शाळेस कायमस्वरूपी शिक्षक न दिल्यास टाळे ठोकण्याचा इशारा
साखराळे युनिटमध्ये प्रतिदिन दीड लाख लिटर इथेनॉल निर्मिती करणार : आ. जयंत पाटील

शिराळा / प्रतिनिधी : चरण, ता. शिराळा गावाजवळ वारणा नदी काठी तब्बल सहा फुटांची एक मगर सापडली एवढी मोठी मगर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांना अतिवृष्ठीमुळे वाढलेले पाणी पातळी ओसरली आहे. मात्र, नदीकाठच्या गावांमध्ये एक नवं संकट निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून वारणा नदीकाठी अनेक ठिकाणी मगरींचा मुक्ती वावर पाहायला मिळत आहे. चरण गावाजवळ ही अशीच एक सहा फुटी महाकाय मगर पकडण्यात आली. नदी काठच्या एका शेतात ही मगर आढळून आली.
चरण येथील फिरोज नायकवडी, आलम नायकवडी, नाजिम डांगे, डॉ. शाहीद कादरी, राजू कुंभार, सचीन बागडे हे वारणा नदीवर मासे मारीसाठी जातात. शनिवारी देखील रोजच्या प्रमाणे सकाळी मासे पकडण्यासाठी वारणा नदी घाटावर गेले असता नदी काटावरील मळी रानात त्यांना काही तरी पडलेले आहे असे निदर्शनास आले. जवळ जावून खात्री केली असता ती मगर असल्याचे समजले.
शर्थीच्या प्रयत्नांतर मगरील जेरबंद करण्यास यश
सर्व तरुणांनी मोठ्या धाडसाने मगरीस अथक प्रयत्नानंतर जेरबंद केले. ही मगर सहा ते सात फुट लांब असल्याने मगरीच्या तोंडास, पाठीस व शेपटीला दोरी गुंडाळून वैरण आणण्यासाठी वापरत असलेल्या गाड्यावर घालून ही मगर गावात आणली. ही माहिती वार्‍या सारखी गावात व परीसरात पसरली. गाड्यावर मगरीस टाकून चरण बस थांबा, गणपती मंदिर, मुस्लिम गल्ली मार्गे घेवून जाताना मगर पहाण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली. मगरच असल्याची खात्री केल्यानंतर युवकांनी व ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क केला. त्यानंतर ग्रामस्थांनी तब्बल सहा फुटी मगरीला वनविभागाच्या ताब्यात दिले.

COMMENTS