बीडमध्ये 24 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये 24 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार

बीड : बीड जिल्हात सामुहिक बलात्काराची संतापजनक घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. बीडमधील एका 24 वर्षीय विवाहितेवर चुलत पुतण्याने ज्यूसमध्ये गुंगी

चांदवड तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पाच गावातील पाणी स्रोत वागदर्डी धरणातून उपलब्ध करण्याबाबत जिल्हा परिषदेने केली तांत्रिक समिती गठीत
विकेंड लॉकडाऊन; जाणून घ्या ! काय सुरू आणि काय बंद राहणार
ज्येष्ठांनी नव्या पिढीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा – शिवाजीराव ससे

बीड : बीड जिल्हात सामुहिक बलात्काराची संतापजनक घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. बीडमधील एका 24 वर्षीय विवाहितेवर चुलत पुतण्याने ज्यूसमध्ये गुंगीचे औषध टाकून तर दुसर्‍याने अश्‍लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोघांच्या मदतीने बीडच्या काठवटवाडी फाट्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे तिघा नराधमांनी रात्रभर छेड काढली. नात्यातीलच नराधम तरुणांनी हे कृत्य केल्याने, बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात नराधम चुलत पुतण्या अजय गवते याच्यावर बलात्काराचा तर पप्पू नरहरी गवते, दत्ता गवते, परमेश्‍वर गवते सर्व रा. बेलुरा या तिघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत. याविषयी पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून, 24 वर्षीय पीडित विवाहित ही आपल्या 2 लहान मुले, नवरा अन सासुसह पुण्यात राहते. मात्र, नवर्‍यासोबत 4 एप्रिल रोजी किरकोळ भांडण झाल्याने ती माहेरी बीडला आली. मात्र आईने ’तू एकटीच का आली, तू परत तुझ्या नवर्‍याकडे जा’ असे सांगितले. त्यांनतर ती बीड शहरातील आपल्या मैत्रिणीकडे काही दिवस राहिली.11 एप्रिलला रोजी पीडिता रात्री ट्रॅव्हल्सने पुण्याला निघाली. यादरम्यान पीडितेचा नात्याने चुलत पुतण्या असणारा आरोपी अजय गवते याने फोन केला. आणि ’मला काकांनी तुम्हाला घेऊन यायला सांगितले आहे, तुम्ही अहमदनगरच्या चांदणी चौकात उतारा’, असं म्हणाला. त्यांनतर पीडिता सांगितलेल्या ठिकाणी उतरली. काही वेळात अजय तिथे आला आणि आता खूप रात्र झाली आहे आपण इथल्या लॉजवर मुक्काम करू अन उद्या निघू असं म्हणाला’. त्यानंतर लॉजवर आल्यावर अजयने गुंगीचे औषध टाकून ज्यूस दिले अन् त्यांनतर अतिप्रसंग करत बलात्कार केला. त्यानंतर अश्‍लील फोटो व्हिडिओ देखील काढले. दुसर्‍या दिवशी नराधम आरोपी अजयने जीपमध्ये बसवून पीडितेला पुन्हा बीडला पाठवले. यावेळी त्याने अश्‍लील फोटो, व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत, आपल्या मित्रांना बोलवून घेत सामूहिक बलात्कार केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पीडितेने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली. यावरून नात्याने चुलत पुतण्या असणार्‍या नराधम अजय गवते याच्यावर बलात्काराचा तर दत्ता गवते, परमेश्‍वर गवते, पप्पू गवते या नराधमांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS