महाराष्ट्रापेक्षा भाजपशासित राज्यांक़डे पाहा  ; रोहित पवार यांचा भाजप नेत्यांना सल्ला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रापेक्षा भाजपशासित राज्यांक़डे पाहा ; रोहित पवार यांचा भाजप नेत्यांना सल्ला

केंद्रीय आरोग्य विभागाची आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्राव्यतिरिक्त छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, पंजाब, बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरयाणा, बिहार आदी राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण असल्याचे दिसते.

विखे पाटील यांच्या पन्नास वर्षाच्या सत्तेला लागला सुरुंग
भातकुडगाव फाटा परिसरातील रेडी नदीवरून गाडी गेली वाहून
वासुदेव देसले यांची उपविभागीय पोलिस अधिकारी पदी पदोन्नती

अहमदनगर/प्रतिनिधीः केंद्रीय आरोग्य विभागाची आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्राव्यतिरिक्त छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, पंजाब, बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरयाणा, बिहार आदी राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण असल्याचे दिसते. या राज्यांपैकी सहा राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपशासित राज्यांमधील कोरोना व्यवस्थापन खूपच चांगले असल्याने तिथे कोरोना येत नाही, हा विरोधकांचा दावा फोल ठरतो, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. 

कोरोनाची राज्यातील परिस्थिती आणि त्यावरून राज्य सरकारवर होत असलेल्या टीकेला पवार यांनी सोशल मीडियातून उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे, ’भाजपचे नेते महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीवरून राजकारण करणे थांबवत नाहीत, हे दुर्दैवी आहे. आज राजकारणाची वेळ नसतानाही महाराष्ट्रातील सरकार असमर्थ आहे, इथली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली अशा प्रकारची विधाने विरोधकांकडून केली जात आहेत. ही गोष्ट मात्र निश्‍चितच खरी आहे, की महाराष्ट्रात रुग्ण संख्या जास्त आहे आणि रुग्णांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे; मात्र हे संकट रोखण्यासाठी जे करणे गरजेचे आहे, ते सर्व राज्य सरकार करते आहे, हेही तेवढेच खरे. राज्यात परत एकदा नाईलाजास्तव कठोर निर्बंध लादण्याची वेळ सरकारवर आली.’ इतर राज्यांची आकडेवारी महाराष्ट्राइतकी नसली, तरी त्या राज्यांच्या लोकसंख्येच्या व शहरीकरणाच्या तुलनेत ती निश्‍चितच चिंताजनक आहे. ज्या राज्यांमध्ये महाराष्ट्रासारखे शहरीकरण अधिक आहे, तिथे रुग्णांची संख्याही अधिक असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातही एकूण रुग्णांच्या जवळपास 50 टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर अशा मोठ्या शहरांमध्येच आहेत. गुजरातचे उदाहरण घ्यायचे झाले, तर तर तिथेही रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सुरत, अहमदाबाद, जामनगरमध्ये बेड मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक रुग्णांवर हॉस्पिटलच्या आवारात, फरशीवर, खुर्चीवर बसून उपचार चालू असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मृतांच्या नातेवाइकांना अंत्यविधीसाठी आठ-आठ तास थांबावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहताना मन हेलावून जाते. रुग्णवाहिका नसल्याने कोणी चार चाकीतून मृतदेह नेत आहे, तर कोणी हात गाड्यावरून. हे आज गुजरातचे भीषण वास्तव आहे, असे पवार यांनी म्हटले आहे. ’उत्तर प्रदेशमध्येही रुग्णांची अवस्था काही चांगली नाही. बिहारमध्येही कोरोनाचे व्यवस्थापन नीट होत नसल्याचे निदर्शनास आले. मृतांची संख्याही सरकार लपवत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. देशभरातील सर्वच राज्य सरकार आर्थिक अडचणीतून जात आहेत, असे निदर्शनास आणून ते म्हणाले, की एकीकडे उत्पन्न खुंटले आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेला हक्काचा निधी मिळत नाही. केंद्र सरकारकडे उत्पन्नाचे स्त्रोत्र अधिक असल्याने स्वाभाविकपणे केंद्राने या सर्व परिस्थितीत जास्तीची जबाबदारी घेणे अपेक्षित आहे; पण तसे होताना दिसत नाही. 

मानवतेची लढाई

’मला आजच्या परिस्थितीबाबत कोणाला दोष द्यायचा नाही. मला विरोधकांनाही हेच सांगायचे आहे, की ही वेळ एकमेकांची उणी-दुणी काढण्याची नसून एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करण्याची आहे. ही लढाई कोणत्याही एका राज्याची किंवा देशाची नसून संपूर्ण मानवतेची आहे. विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे कोरोना हा केवळ एखाद्याच राज्यात वाढत नसून तो सगळीकडेच वाढतो. या कठीण काळात सगळ्या यंत्रणेचा कस लागतो आहे. अशा परिस्थितीत आपण भांडत बसलो तर त्यात नुकसानच अधिक होणार आहे.’ असे ते पवार म्हणाले. 

COMMENTS