Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. वाकचौरे यांनी घेतली माजी मंत्री गडाख यांची भेट

कोपरगाव ः शिर्डी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकताच विजय मिळवला असून त्या निमित्त त्यांनी नेवासा विधानसभा मतदार संघ

सरपंच परमीटरूम, उपसरपंच हॉटेल नावाला हरकत : किरण अंत्रे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार
दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीने बैठक घ्याः आ. काळे
Ahmednagar : आमदार मोनिका राजळेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात | LOKNews24

कोपरगाव ः शिर्डी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकताच विजय मिळवला असून त्या निमित्त त्यांनी नेवासा विधानसभा मतदार संघाचे आमदार व माजी मंत्री शंकरराव गडाख यांची सदिच्छा भेट घेतली असून निवडणुकीत केलेल्या मदतीबाबत धन्यवाद दिले आहे. दोन्ही नेत्यांनी उबाठा सेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे एक तास चर्चा केली आहे. त्यांनतर त्यांनी शनी शिंगणापूर येथे जाऊन भगवान शनेश्‍वराच्या ठिकाणी विधिवत पूजा केली आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी04 लाख 76 हजार 900 मते मिळवत सत्ताधारी गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यावर 50 हजार 529 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहे. त्यांच्या या विजयात नेवासा तालुक्याचे मोठे योगदान राहिले असून त्या निमित्त त्यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. सदर प्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, जेष्ठ नेते विश्‍वासराव गडाख, निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे, संघटक नानासाहेब गाढवे, उदयन गडाख, रोहित वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर प्रसंगी माजी मंत्री गडाख यांनी नवोदित खा. वाकचौरे यांच्या विजयाबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे. दरम्यान त्यानंतर खा. वाकचौरे यांनी नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर येथील देवस्थानला भेट दिली असून तेथे भगवान शनैश्‍वरास अभिषेक व विधिवत पूजन व दर्शन घेतले आहे. त्यांचा शिंगणापूर संस्थानच्या वतीने शाल श्रीफळ देऊन व शनी  देवस्थानची माहिती पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आला आहे.

COMMENTS