Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आजोबा स्व.सुमनभाई शाह यांचा सेवाभावी शैक्षणिक वारसा जपणार ः रोहित शाह

श्रीरामपूर ः अ‍ॅड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचालित विद्यानिकेतन शैक्षणिक संकुल श्रीरामपूरचे भूषण असून माझे आजोबा स्व. सुमनभाई फकिरचंद शाह यांनी

श्रीगोंद्यात वीज नसल्याने संभाजी ब्रिगेड आक्रमक
धक्कादायक, अपघातात अधिकाऱ्याचा मृत्यु | LOKNews24
अकोले बस स्थानकात प्रवासी दिन उत्साहात

श्रीरामपूर ः अ‍ॅड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचालित विद्यानिकेतन शैक्षणिक संकुल श्रीरामपूरचे भूषण असून माझे आजोबा स्व. सुमनभाई फकिरचंद शाह यांनी या शैक्षणिक क्षेत्रात विचार, कार्याचा, योगदानाचा जो सेवाभावी वसा आणि वारसा निर्माण केला तोच आदर्श जपत विद्यानिकेतन शैसणिक संकुलास सदैव आजोबांच्या योगदानाचा वारसा जपणार असणार असल्याचे मत रोहित संजय शाह यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील ऐनतपूर शिंदेनगर भागातील विद्यानिकेतन शैक्षणिक संकुलात आणलेल्या नवीन बसस्कूलचे उद्घाटन, पूजन रोहित शाह व सौ. पूजा शाह यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात रोहित शाह बोलत होते. डॉ. राजीव शिंदे यांनी स्वागत केले. स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात, सुमनभाई शाह, प्राचार्य टी. ई. शेळके, सुखदेव सुकळे आदिंच्या पायाभूत योगदानाच्या आठवणी सांगितल्या. प्रतिष्ठानचे कार्यकारिणी चेअरमन प्राचार्य टी. ई. शेळके यांनी प्रास्ताविकमधून प्रतिष्ठनच्या स्थापनेचा इतिहास सांगितला. स्व. सुमनभाई शाह यांनी प्रतिष्ठानची संकल्पना व शाळेची आवश्यकता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना सांगितली. थोरात यांनी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. सहा महिन्यानंतर शाळा प्रवेशाची जाहिरातच त्यांनी पेपरला दिली, अङ् रावसाहेब शिंदे यांना न सांगता हा प्रतिष्ठान विद्यानिकेतन शाळा प्रवास सुरु झाला. स्व. सुमनभाई शाह यांच्या आग्रहातून सुरु झालेला हा शिक्षणप्रवास असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी मनोगतातून शाळेच्या आदर्श वाटचालीचा गौरव करून रोहित शाह व पूजा शाह यांच्या हस्ते झालेले स्कूलबसपूजन हे प्रगतिकारक, कृतज्ञता जाणिवेचे असल्याचे सांगितले. प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी नव्या स्कूलबसच्या पूजन सोहळ्याचे कौतुक केले. रोहित शाह यांनी विद्यानिकेतन शाळेचा कौतुकास्पद प्रवास सांगून डॉ. राजीव शिंदे, डॉ. प्रेरणा शिंदे, प्राचार्य टी. ई शेळके, सुखदेव सुकळे तसेच संबंधित पदाधिकारी, शिक्षक यांचे योगदान लाभत असल्याने विद्यानिकेतन शैक्षणिक संकुल प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. सतिश थोरात, वर्षा धामोरे, त्रिभुवन तसेच शिक्षक, शिक्षकेतर सेवक आदिंनी नियोजन केले यावेळी पालकवर्ग उपस्थित होते. भारती कुदळे यांनी आभार मानले.

COMMENTS