गुटका-मावा माफियांना पोलिसांचा दणका, 10 लाखाचा माल जप्त;11 जणांना केली अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुटका-मावा माफियांना पोलिसांचा दणका, 10 लाखाचा माल जप्त;11 जणांना केली अटक

अहमदनगर/प्रतिनिधी-गुटका व मावा तसेच सुगंधी तंबाखू-पानमसाला विकणार्‍या माफियांना पोलिसांनी दणका दिला आहे. महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या

Kopargoan : आमदार आशुतोष काळेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा l LokNews24
दुचाकीस्वारांना लुटणार्‍या दोघांना पकडले ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
चोरीच्या विविध गुन्ह्यांतील तीन आरोपींना पकडले

अहमदनगर/प्रतिनिधी-गुटका व मावा तसेच सुगंधी तंबाखू-पानमसाला विकणार्‍या माफियांना पोलिसांनी दणका दिला आहे. महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या गुटका, पानमसाला, सुगंधी तंबाखू, मावा विक्रेत्यांविरुध्द अहमदनगर शहर व जिल्ह्यामध्ये कारवाई केली असून, या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी 10 लाख 9 हजार 870 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आठ ठिकाणी छापा टाकून मुद्देमालासह 11 जणांना अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या गुटका,पानमसाला व मावा विक्रेत्यांविरुध्द नगर जिल्ह्यामध्ये कारवाईची विशेष मोहीम राबवली. दि. 21 ते दि. 26 ऑगस्टचे दरम्यान आठ ठिकाणी छापे टाकून एकूण 10 लाख 9 हजार 870 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचा गुटका, पानमसाला, सुगंधी तंबाखू, कच्ची सुपारी, तयार मावा, चुना, मावा तयार करण्याचे इलेक्ट्रिक मशीन जप्त करून अकरा जणांविरुद्ध कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी व शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय संहिता 1860 चे कलम 328, 188, 272, 273 नुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

नगरमध्ये केली सुरुवात
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून 5 हजार 400 रुपये किमतीची प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू, सुपारी, मावा असा मुद्देमाल जप्त करून समीर मेहमूद सय्यद (वय 35, रा. नेप्ती, ता. नगर) याला अटक केली. पारशाखुंट येथे छापा टाकून रियाज रहीमबक्ष तांबोळी (वय 53) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील सुगंधी तंबाखू व सुपारी भावा असा अठरा हजार सातशे रुपयांचा माल जप्त केला तसेच काटवन खंडोबा नगर येथील एका घरात छापा टाकून पोलिसांनी 4 लाख 55 हजार 500 रुपये किमतीची प्रतिबंधीत वेगवेगळ्या कंपनीची सुगंधी तंबाखू, कच्ची सुपारी, मावा, चुना, मावा तयार करण्याचे इलेक्ट्रिक मशीन व प्लॅस्टिक पिशव्या असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत रमजान पठाण, (वय 30, रा. संजयनगर, काटवन खंडोबा) याला अटक केली. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नालेगाव परिसरातील दातरंगे मळा येथे छापा टाकून 96 हजार 700 रुपये किमतीची प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू, सुपारी, मावा असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत विजय विष्णू सब्बन (वय 30, रा. दातरंगे मळा, अ.नगर ) याला अटक केली. तसेच राजू नारायण सब्बन (रा. बागडपट्टी, तोफखाना) याच्या ताब्यातून 1 लाख 16 हजार 418 रुपये किमतीची सुगंधी तंबाखू व पानमसाला जप्त करण्यात आला. तसेच बोल्हेगाव रेणुका नगर येथील टपरीवर छापा टाकून अमोल नानासाहेब काळे याच्या ताब्यातून 62 हजार 452 रुपये किमतीची सुगंधी तंबाखू पानमसाला असा मुद्देमाल जप्त केला. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निंबळक येथे छापा टाकून पोलिसांनी 3 लाख 17 हजार 800 रुपये किमतीची प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू, सुपारी, मावा असा मुद्देमाल जप्त करून राजू शामराव वराट (वय 35, रा. निंबळक, ता. नगर) याला अटक केली.

शेवगावला मोठी कारवाई
शेवगाव येथील बोधेगावातील घारतळे गल्लीत छापा टाकून 16 हजार 900 रुपये किमतीची प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू व मावा असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत राजेन्द्र पंढरीनाथ शिंदे (रा. घारतळे गल्ली, बोधेगाव, ता. शेवगाव), लतीफ बाबा शेख (वय 45, रा. भराट गल्ली, बोधेगाव, ता. शेवगाव), रम्मू बाबा शेख (वय 39, रा. भराटगल्ली, बोधेगाव,शेवगाव), जमीर रशीद शेख (वय 38, रा. मंगल कार्यालयासमोर, बोधेगाव, ता. शेवगाव) यांना अटक केली.

तो़फखाना पोलिसही सक्रिय
तारकपूर सिंधी कॉलनी परिसरातून पंचेचाळीस हजार रुपये किमतीची सुगंधी तंबाखू जप्त करण्याची कारवाई तोफखाना पोलिसांनी केली. तारकपूर परिसरातील सिंधी कॉलनीमध्ये एका घरात ही कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती अशी की महिला पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस पथकाने पंचांसमक्ष राकेश कंत्रोड याच्या घरावर छापा टाकला. त्याच्या घराची झडती घेतली असता दोन प्लास्टिकच्या गोण्या व एक पोते आढळून आले. यात 45 हजार रुपये किमतीची सुगंधी तंबाखूची पाकिटे आढळून आली. पथकाने मुद्देमाल जप्त करत राकेश कंत्रोड याला ताब्यात घेतले. कंत्रोड याच्याविरुध्द शरीरास अपायकारक, नशाकारक पदार्थाची विक्री करण्यासाठी मालाचा साठा केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी पोलिस कॉन्स्टेबल शैलेश गोमसाळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सुरज मेढे, पोलिस हवालदार शकील सय्यद, पोलिस हवालदार एस. एस. त्रिभुवन, ए. आर. आंधळे, महिला पोलिस नाईक तांबे, शिंदे यांनी केली आहे.

COMMENTS