Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी तालुक्यातील करडवाडी गावात दारूबंदी करावी

पाथर्डी ः पाथर्डी तालुक्यातील करडवाडी येथे शाळेजवळच अवैध दारू विक्री होत असून ती त्वरित बंद करावी या प्रमुख मागणीसाठी करडवाडी येथील महिलांनी पाथर

मुलांची लग्नगाठ संपवणार गडाख-घुलेंचे राजकीय वैर…; मंत्री गडाखांचा पुत्र आणि घुलेंच्या कन्येचे शुभमंगल चर्चेत
संजीवनीच्या चार्वी कोठारीची प्रज्ञाशोधसाठी निवड        
ज्ञानशील कुटुंबासाठी प्रत्येक घरात छोटे पुस्तकालय असावे ः डॉ. बाबुराव उपाध्ये

पाथर्डी ः पाथर्डी तालुक्यातील करडवाडी येथे शाळेजवळच अवैध दारू विक्री होत असून ती त्वरित बंद करावी या प्रमुख मागणीसाठी करडवाडी येथील महिलांनी पाथर्डी पोलीस स्टेशनला येऊन अधिकार्‍यांकडे दारू बंदीची मागणी केली आहे.
या संदर्भात करडवाडी येथील महिला व ग्रामस्थ यांनी बुधवारी पाथर्डी पोलिस ठाण्यात येऊन पोलिस अधिकार्‍यांची भेट घेतली.मात्र कारवाई करण्या ऐवजी पोलीस अधिकार्‍यांनी हात झटकून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे बोट दाखवल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून उग्र आंदोलन करण्याचा पवित्रा आता महिला ग्रामस्थांनी घेतला आहे.करडवाडी येथे गेल दहा वर्षापासून गावातील दोन इसम हे अवैध दारू विकण्याचा त्यांचा व्यवसाय सुरूच आहे.गावामध्ये वेगवेगळ्या दोन ठिकाणी राज रोजपणे दारू विकले जाते. है दारु विकणारे गुंड प्रवृत्तीचे लोक कायदा धाब्यावर बसून गावातील लोकांना व्यसनाधीन बनवण्याचा प्रयत्न कोणाच्या आशीर्वादाने होत आहे? असा सवाल यावेळी पोलिसांना विचारण्यात आला आहे. यापूर्वी अनेकदा पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागालाही वारंवार लेखी आणि तोंडी तक्रार करून सुद्धा गावात बेकायदेशीरपणे दारू विक्री सुरूच आहे. अनेक लोकांचे कुटुंब दारूमुळे उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.

दोन लोकांच्या फायद्या करतात गावातील असंख्य ग्रामस्थांच्या योग्य मागणीकडे प्रशासन का दुर्लक्ष करतोय त्यामागे कोणाचा हात आहे.कारवाई करण्यास कोणती अडचणी येत आहे? गावातील दारू कधी बंद होणार? या दारूमुळे आमचे पती आम्हाला रोज मारहाण करतात,व्यसनाधीन झालेल्या कुटुंबातील व्यक्तींकडून आमचा मानसिक व शारीरिक छळ होत आहे. कोणाचा पती तर कोणाचा मुलगा हा दारूमुळे काही कामधंदा करत नाही. दारू पिण्यासाठी घरातील वस्तूंची व अन्नधान्यांची परस्पर विक्री व्यसनाधीन झालेली व्यक्ती करत असल्याचे महिलांनी व्यथा मांडली. यावेळी शारदा टापरे, लीला पालवे, शीला गर्जे, राणी गर्जे, प्रतिभा गर्जे, शारदा गर्जे, जनाबाई टापरे, मालन नाकाडे, नंदाबाई कराड, शोभा कराड, सिंधुबाई टापरे, नंदा घुले, वच्छला कराड, सीमा गर्जे, पदम कराड, आदिनाथ गर्जे, संतोष जाधव, संतोष टापरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

COMMENTS