Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोर्शे कार अपघाताचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत ?

विरोधकांचे सत्ताधार्‍यांवर गंभीर आरोप

पुणे ः पुण्यातील पोर्श कार अपघातप्रकरणाचा गुंता अजूनच वाढतांना दिसून येत आहे. तसेच या प्रकरणाची व्याप्ती मोठी असूनही पोलिसांकडून बरीच माहिती दडवण

पुणे जिल्ह्यात होळी, धुळवड साजरी करण्यावर बंदी
खासदार लोखंडे भ्रष्टाचारात ‘अव्वल’ ; अनुदान लाटण्यात ‘पटाईत’
अंडरवर्ल्डशी राष्ट्रवादी काँग्रेसचं काही नातं आहे का…? (Video)

पुणे ः पुण्यातील पोर्श कार अपघातप्रकरणाचा गुंता अजूनच वाढतांना दिसून येत आहे. तसेच या प्रकरणाची व्याप्ती मोठी असूनही पोलिसांकडून बरीच माहिती दडवण्यात येत असल्याचे समोर येत आहे. पोर्शे कार अपघातानंतर अटक करण्यात आलेल्या डॉ. अजय तावरे यांनी दिला होता. यावरुन सुषमा अंधारे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे त्यांनी थेट मंत्रालयातील सहाव्या मजल्याशी जोडले आहेत. इतकेच नाही तर तर सत्ता बदलावेळी मंत्रालयाचा सहाव्या मजल्यावर नेमके काय घडले? हे सर्वही तावरेंकडून समोर येऊ शकते, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

या प्रकरणात बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी सत्ताधारी मंत्र्यांने पुणे पोलिस आयुक्तांना फोन केल्याचा आरोप केला जात आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे हे रात्री 3 वाजता पोलिस ठाण्यात पोहोचले, यावरही प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. यासोबतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अपघाताच्या दिवशी या पोर्श कार मधून बिल्डर पुत्रासोबत एका आमदाराचा मुलगाही प्रवास करत होता असल्याचे म्हटले आहे. अपघातानंतर कारमधून दोघेजण खाली उतरले. दुसरा कोण होता हे सरकारने उघड करावे. एवढेच नाही तर या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. नाना पटोले म्हणाले, ससुन रुग्णालय हे गुन्हेगारांचे पंचतारांकित हॉटेल बनले आहे. नागपूर, जळगाव, पुण्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत, पण धक्कादायक बाब म्हणजे आरोपींना तात्काळ जामीन मिळावा यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे पुणे कार अपघाताचा तपास सीबीआयने करावा, असेही ते म्हणाले. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोपही त्यांनी केला. अल्पवयीन आरोपीसोबत एका आमदाराचा मुलगाही होता, असा दावा त्यांनी केला. बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, असे मानण्यास आपल्याकडे अनेक कारणे आहेत. याचे कारण बिल्डरचे सत्ताधारी पक्षांशी चांगले संबंध आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे याचे एका नेत्याशी संबंध आहे. तावरेला सोमवारीच अटक करण्यात आली असून त्याच्यावर अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप आहे. यापूर्वी याच रुग्णालयात ड्रग माफिया ललित पाटील यांना पंचतारांकित सुविधा देण्यात आल्या होत्या. अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी या डॉक्टरच्या नियुक्ती करण्यासाठी शिफारस पत्र वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना दिले होते, असा आरोप देखील पटोले यांनी केला आहे.

बाल न्याय मंडळातील सदस्यांचीही होणार चौकशी – बाल न्याय मंडळाच्या सदस्यांच्या वर्तनाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याची माहिती राज्य महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नरनावरे यांनी दिली.  दरम्यान बाल हक्क न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला जामीन देताना अनेक अटी घातल्या होत्या. त्यामध्ये अपघात विषयावर निबंध आणि 15 दिवस वाहतूक नियंत्रण करण्याच्या अटीचा समावेश होता. अल्पवयीन मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासह विविध अटी घालून 15 तासात जामीन दिल्याने बाल हक्क न्याय मंडळ वादात सापडले होते. त्यामुळे बाल न्याय मंडळातील सदस्यांचीही चौकशी होणार आहे.

अजय तावरेला थेट मंत्रालयातून संरक्षण ः अंधारे – पोर्शे कार अपघात प्रकरणात ससूनच्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक झाली. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर  यांच्या जीविताला धोका आहे.  4 जूनला लोकसभा निकालानंतर गौप्यस्फोट करणार असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे म्हणाल्या. त्या पुण्यात बोलत होत्या.  कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा, यासाठी खुलासे 4 जूननंतर करणार, असल्याचा  इशारा सुषमा अंधारेंनी दिला आहे. पोर्शे अपघात प्रकरणात अनेक मोठे प्रस्थ गुंतले असून अजय तावरेला थेट मंत्रालयातून संरक्षण असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

COMMENTS