Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यंदाही बारावीमध्ये मुलींची बाजी

91.25 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ः कोकण विभाग अव्वल, मुंबई तळाशी

पुणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेबु्रवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल

Aurangabad : अधिकाऱ्यांना काळे फासून पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने उभा करू | LOKNews24
झारखंडमध्ये पाच माओवाद्यांचा खात्मा
आ. थोरात यांच्याकडून वाचनालयास पुस्तके भेट

पुणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेबु्रवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी जाहीर करण्यात आला असून, यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.  ारावीच्या परीक्षेला बसलेल्या 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थ्यांपैकी 91.25 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल असून कोकणचा निकाल 96.01 टक्के आहे. तर मुंबई विभाग निकालत तळाशी असून मुंबईचा निकाल सर्वात कमी 88.13 टक्के इतका घसरला आहे. मुलींचा निकाल 93.73 टक्के तर मुलांचा निकाल 89.14 टक्के लागला आहे.

राज्य मंडळाच्या या परीक्षेसाठी राज्यातून 14 लाख 28 हजार 194 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल 2.97 टक्क्यांनी घट झाली आहे. सर्व विभागीय मंडळातून 93.73 टक्के (नियमित) विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून 89.14 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी 4.59 टक्क्यांनी जास्त आहे. सर्व शाखांमधून 35 हजार 583 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 36 हजार 454 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 82.39 आहे. यंदा बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक 96.09 टक्के असून कला शाखेचा निकाल 84.05 टक्के, वाणिज्य 90.42 टक्के आणि व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल 89.25 टक्के इतका लागला आहे.

विभागनिहाय निकाल –
कोकण विभाग – 96.01 टक्के
पुणे विभाग – 93.34 टक्के
नागपूर विभाग – 90.35 टक्के
औरंगाबाद विभाग – 91.85टक्के
कोल्हापूर विभाग – 93.28 टक्के
अमरावती विभाग – 92.75 टक्के
नाशिक विभाग – 91.66 टक्के
लातूर विभाग – 90.37 टक्के
मुंबई विभाग – 88.13 टक्के

मुलींचा निकाल मुलांपेक्षा 4.59 टक्के जास्त – राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी, मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.73 टक्के तर मुलांचा निकाल 89.14 टक्के लागला आहे. म्हणजेच मुलींचा निकाल मुलांपेक्षा 4.59 टक्के जास्त लागला आहे.

23 विषयांचा निकाल 100 टक्के- 154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. बारावीची परीक्षा एकूण 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

COMMENTS