Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हुमणी किडीचा वेळीच बंदोबस्त करा ः भरत दवंगे

लोणी ः अहमदनगर जिल्ह्यामध्ये नुकताच बर्‍याच ठिकाणी वादळी पाऊस होऊन गेलेला असून या पावसामुळे या जमिनीत सुप्तावस्थेत असलेले हुमणीचे भुंगेरे बाहेर प

अखेर कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सुटले
दुचाकीची धडक बसल्याने वृद्ध महिलेचा झाला मृत्यू
प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक ः कोळेकर

लोणी ः अहमदनगर जिल्ह्यामध्ये नुकताच बर्‍याच ठिकाणी वादळी पाऊस होऊन गेलेला असून या पावसामुळे या जमिनीत सुप्तावस्थेत असलेले हुमणीचे भुंगेरे बाहेर पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि या भुंगेर्‍यांचे वेळीच नियंत्रण केले तर तरच पावसाळ्यामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढणार नाही अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्‍वरचे पीक संरक्षण विभागाचे प्रमुख भरत दवंगे यांनी दिली. दवंगे यांनी सांगितले की, दरवर्षी पहिला पाऊस पडल्यानंतर या हुमणीची भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात आणि रात्रीच्या वेळी कडुलिंब, बोर, बाभूळ किंवा चिंचेच्या झाडावर एकत्रित जमा होतात आणि  झाडांचा पाला खातात. सकाळ झाल्याबरोबर हे भुंगेरे पुन्हा जमिनीत जातात आणि यातील मादी भुंगेरा जमिनीत अंडी टाकण्यास सुरुवात करतो. हे भुंगेरे सर्वसाधारण तीस दिवस जगतात आणि दररोज दोन अंडी जमिनीत टाकतात. या अंड्यामधून दहा ते पंधरा दिवसानंतर हु मणीची अळी जन्म घेते आणि एकदा जन्म झाल्यानंतर ही ळी जवळजवळ आठ महिने जमिनीमध्ये जिवंत राहते.या काळात ही अळी पिकांची मुळे कुरतडून खाते. त्यामुळे ऊस, मका, बाजरी, भुईमूग यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. ते टाळण्यासाठी या हुमणी अळीचे वेळीच नियंत्रण होणे आवश्यक आहे. हुमणी अळीचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करण्यासंदर्भात श्री दवंगे यांनी सांगितले की या किडीचे भुंगेरे रात्रीच्या वेळी बाहेर पडतात आणि कडुनिंब बाभूळ किंवा बोरीसारख्या झाडांवर पाला खाण्यासाठी एकत्र जमा होतात. असे हे एकत्र झालेले भुंगेरे शक्य असल्यास रात्रीच्या वेळी प्रकाश सापळ्याचा वापर करून  एकत्रित पकडून नष्ट केल्यास या किडीचा प्रादुर्भाव भविष्यात वाढत नाही. हुमणीचे भुंगेरे प्रकाश सापळ्याचा वापर करून एकत्रितपणे नष्ट करणे हा या किडीवर अतिशय रामबाण प्रतिबंधात्मक उपाय आहे. कारण भुंगेरे एकत्रित  पकडून नष्ट केल्यास जमिनीमध्ये या किडीची अंडी पडणार नाहीत आणि त्यामुळे हुमणी अळीचा जन्मच होणार नाही. याशिवाय जून जुलै महिन्यामध्ये मेटारायझियम अनिसोपली  या जैविक कीटकनाशकाचा प्रति एकरी दोन लिटर  या प्रमाणामध्ये सेंद्रिय खताबरोबर किंवा स्लरीसोबत शेतात वापर करावा. उस किंवा मका सारख्या पिकांमध्ये पिकाला भुजवटा देताना किंवा रासायनिक खतांची मात्रा टाकताना प्रति एकरी दहा किलो 3 टक्के दाणेदार फिप्रोनील हे कीटकनाशक शेतात वापरावे असे श्री दवंगे यांनी सांगितले. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये जर या हुमणी अळीचा प्रादुर्भाव जास्त वाढला तर पिकांमध्ये ठिबकच्या साह्याने किंवा वाहत्या पाण्यासोबत फिप्रोनील 40 टक्के अधिक इमिड्याक्लोप्रिड 40 टक्के हे संयुक्त कीटकनाशक 150 ग्रॅम प्रति एकरी शेतात सोडावे असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्‍वर यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

COMMENTS