राहाता ः मुंबई येथे सोमवारी जोरदार वादळी वार्याने होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला. जवळपास 80 जण या होर्डिंगखाली दाबून जखमी झाले आहेत. राहा
राहाता ः मुंबई येथे सोमवारी जोरदार वादळी वार्याने होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला. जवळपास 80 जण या होर्डिंगखाली दाबून जखमी झाले आहेत. राहाता शहरातही काही प्रमाणात रस्त्याच्या कडेला तसेच राहाता बस स्थानक, जुनी नगरपरिषद इमारत, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तसेच काही इमारती व दुकानावर होर्डिंग लावलेले आढळून येत आहे.
पुढील महिन्यात पावसाचे आगमन होत असल्याकारणाने वादळी वार्याने होर्डिंग कोसळून दुर्घटना होण्याचे शक्यता नाकारता येत नाही. याचे जिवंत उदाहरण मुंबई झालेल्या दुर्घटनेचा राहाता नगरपालिकेने याचा धडा घेऊन शहरातील अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई करणार का, असा प्रश्न शहरातील नागरिका मध्ये चर्चा होत आहे. शहरांमध्ये काही ठिकाणी होर्डिंग लावण्यात आलेले आहे. या होर्डिंग्सला राहाता नगर परिषदेकडून मान्यता दिलेली आहे किंवा नाही याचीही खातरजमा पालिकेने केली पाहिजे. ज्या होर्डिंगची परवानगी संपलेली असेल अशा होर्डिंग्स काढून घेण्यात यावे अशीही मागणी होत आहे. तर अनाधिकृत असलेल्या होल्डिंगवर अतिक्रमण विभागामार्फत कारवाई होणार? मुंबई येथील दुर्घटनेचा नगर परिषदेने वेळीच धडा घ्यावा असा संवाल नागरिक उपस्थित करत आहे.
राहाता शहरात केवळ एकाच होर्डिंगला परवानगी – शहरामध्ये किती होल्डिंग आहे, याबाबत राहाता नगरपरिषदेमध्ये प्रत्यक्षात जाऊन चौकशी केली असता. शहरांमध्ये फक्त एकच होर्डिंगला परवानगी देण्यात आलेले असून बाकीचे सर्व अवैद्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.तर राहाता बस स्थानक परिसरात असलेले होल्डिंग विषयी तेथील कोट्रोलर यांच्याशी संपर्क केला असता येथील होल्डिंग हे सुस्थित असून यांची परवानगी असल्याची माहिती कोट्रोलर यांनी दिली.
COMMENTS