Homeताज्या बातम्यासंपादकीय

मान्सूनची सलामी

वेळेआधीच मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे, आठवडाभरात मान्सून केरळमध्ये आणि त्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्य

पुण्याचा लौकिक आणि आजची स्थिती
संपत्तीची मस्ती आणि व्यवस्था
चिन्ह गोठवले, पुढे काय… ?

वेळेआधीच मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे, आठवडाभरात मान्सून केरळमध्ये आणि त्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी मान्सूनने संपूण महाराष्ट्र व्यापण्यासाठी बराच दिवसांचा कालावधी लागत असल्यामुळे दरवर्षी पेरण्या लांबणीवर पडतांना दिसून येत आहे. मात्र यंदा पेरण्या वेळेवर होण्याची शक्यता आहे. खरंतर मे महिन्याच्या सुरूवातीला उष्णतेच्या झळा तीव्र झाल्या होत्या. महाराष्ट्रात उष्माघाताचे रूग्ण सातत्याने वाढत होते. त्यानंतर मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात झाली. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे कांद्याचे तसेच फळबागांचे, आंब्यांचे नुकसान झाले असले तरी, अवकाळी पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा दिसून आला. तसेच शेतीच्या मशागतींच्या कामांना वेग आला. मान्सून 19 मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाला आहे. यामुळे शेतकर्‍यांना लगबगीने शेतीच्या कामांना लागावे लागणार आहे. मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. तसेच महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होणार आहे. राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होते आहे. कुठं उन्हाचा तडाखा सुरु आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा कहर आहे. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात पुढील आठवडाभर म्हणजे रविवार 26 मे पर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. गेल्यावर्षी राज्यात अपुर्‍या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट राज्यावर असून अनेक जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईबरोबरच चारा टंचाईदेखील मोठ्या प्रमाणावर जाणवतांना दिसून येत आहे. त्यामुळे यंदा पाऊस लवकर पडण्याची अपेक्षा शेतकर्‍यांकडून करण्यात येत होती. अखेर मान्सून अंदमानमध्ये दाखल झाल्यामुळे शेतकरी आनंददायी असून, तो लवकरच मुंबईत दाखल होण्याची शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. देशामध्ये मान्सून दाखल होण्यापूवी मात्र एकीकडे उष्णतेच्या झळा तर दुसरीकडे अवकाळी पाऊस असे विरोधाभासाचे वातावरण दिसून येत आहे. या विरोधीभासाला तापमानवाढीची समस्या कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप आणि जीवाष्म इंधनांचे ज्वलन ही जागतिक तापमानवाढीची महत्त्वाची कारणे होती. पण 2023 साली त्यात हवामानाच्या ’अल-निनो’ परिणामानेही हातभार लावला. सन 2023 च्या मध्यापासून अल-निनो परिणाम प्रभावी होण्यास सुरुवात झाली आणि सध्याही त्याचा प्रभाव वाढत आहे. सुमारे 100 ते 150 वर्षांपूर्वीपर्यंत अनेक शतके पृथ्वीचे सरासरी तापमान फारसे वाढले नव्हते. औद्योगिक क्रांतीनंतर या परिस्थितीत वेगाने बदल होत गेला. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप, प्रदूषण, जंगलतोड, हरितगृह वायूंचे उत्सर्जन आदी कारणांमुळे गेल्या काही वर्षांत पृथ्वीचे सरासरी तापमान बरेच वाढले आहे. सन 1850 ते 1900 या वर्षांमध्ये जागतिक सरासरी तापमानवाढ अर्धा अंश सेल्सिअसपेक्षा कमी होती. ते प्रमाण 1940 ते 1980 दरम्यान अर्धा अंश सेल्सिअसपर्यंत आले. 1980 ते 2000 या काळात दरवर्षी पृथ्वीचे सरासरी तापमान साधारण एक अंश सेल्सिअसने वाढत गेले. त्यानंतर हा वेग जवळपास दीड अंश सेल्सिअसपर्यंत वाढू लागला. त्यामुळे भविष्यात जर अशीच परिस्थिती राहिली तर, मानवी जीवनामध्ये अडचणी निर्माण होवू शकतात. वास्तविक पाहतात मानव आपले जीवन सुखकर करण्यासाठी अनेक यत्रांचा शोध लावतांना दिसून येत आहे. त्यामुळे मानवी काम सोपे होत असले तरी, तापमानवाढ रोखण्याकडे तो मात्र दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. सर्वाधिक झाडे लावण्यासाठी आणि ती जगवण्यासाठी मानव प्रयत्न करतांना दिसून येत नाही, परिणामी तापमानवाढ सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम मानवी जीवनांवर होतांना दिसून येत आहे.

COMMENTS