Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

फळबागांसह केळी, आंबा उत्पादकांना मोठा फटका

मुंबई ः गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकण, मध्य

राज्यावर अवकाळी पावसाचे संकट
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी
राज्यावर अवकाळी पावसाचे संकट

मुंबई ः गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. जोरदार वारे आणि विजेच्या गडगडाटासह लातूरमध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. बुलढाणा जिल्ह्यातही अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी दिसत आहेत. खामगाव, शेगाव परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस सुरु आहे.
या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ, कोकणात  अवकाळी पाऊस झाला आहे. वादळी वार्‍यासह पावसाचा केळी, आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. कुठे झाडे कोसळले तर कुठे विजेचे खांब पडले, कुठे रस्ते बंद झाले आहेत. अवकाळीने शेतकर्‍यांना फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसटल्याने शेतकरी बळीराजा चिंतेत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देखील अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला. या वादळी पावसामुळे आंबा बागायतदारम बरोबरच खेड तालुक्यातील वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांच्या केळीच्या आणि पपईच्या बागांना देखील मोठा फटका बसला आहे. 25 एकर होऊन अधिक क्षेत्रात असणार्‍या पपई आणि केळीच्या बागा अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. हजारो पपईंची आणि केळीची झाडे मोडून अक्षरशः चिखलात पडलेली पाहायला मिळत आहे. एका बाजूला आंबा बागायतदार उद्ध्वस्त झालेत त्याच बरोबर कोकणात नाविन्यपूर्ण शेती करणार्‍या शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. कोकणातील प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांच्या शेतातील केळी आणि पपईची हजारो झाडे जमीनदोस्त झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात वादळी वार्‍यासह पावसाचा केळी उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेल्या केळी बागांसह लहान बागाचं नुकसान झाले आहे. तालुक्यात जवळपास 20 हेक्टरवर केळीचे नुकसान झाल्याची माहिती आहे. इंदापूर तालुक्यातील केळी उत्पादकांना मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे.

राज्यात 19 मेपर्यंत पावसाचा अंदाज – राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस अजूनही थांबण्याची चिन्हे नाहीत. कारण कर्नाटक ते पूर्व विदर्भ या भागापर्यंत असलेला द्रोणीय स्थितीचा प्रभाव कमी झाला आहे. मात्र, अरबी समुद्राच्या मध्यभागापासून ते येमेनपर्यंत चक्रीय स्थिती आहे. याचा परिणाम कोकण किनारपट्टीवर होणार आहे.  त्यामुळे अवकाळीचा मुक्काम 19 मेपर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत अवकाळी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार कोसळणार आहे. विशेषत:, सिंधुदुर्ग, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

COMMENTS