Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संतसाहित्य माणुसकीचे भरणपोषण करणारे ः ह.भ.प. बापू महाराज देवतरसे

श्रीरामपूर ः संत आणि संतसाहित्य हे अमरत्वाचे पुण्यमयी धन असून संतांनी भक्तीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाच्या तळमळीतून संतसाहित्य निर्माण केले ते म

भाजप का करतेय विखे पिता पुत्रांच्या आर्थिक घोटाळ्याकडे दुर्लक्ष ?
नगर मनमाड रोडवर अपघात ; २ ठार तर तीन जण जखमी | LOKNews24
देवळाली प्रवरा नगरपरिषदेत ’सेल्फी विथ व्होट स्पर्धा’

श्रीरामपूर ः संत आणि संतसाहित्य हे अमरत्वाचे पुण्यमयी धन असून संतांनी भक्तीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाच्या तळमळीतून संतसाहित्य निर्माण केले ते माणुसकीचे भरणपोषण करणारे असल्याचे प्रतिपादन आरडगाव येथील ह.भ.प. बापू महाराज देवतरसे यांनी केले.
श्रीरामपूर येथील इंदिरानगरामधील ग्रंथा वाचनालयातर्फे ह.भ.प. बापू महाराज देवतरसे यांचा अध्यात्म कार्य, विचार आणि समर्पित जीवन    वाटचालीबद्दल संतपूजन, सन्मान करण्यात आला, त्यांना डॉ. ललिता गुप्ते, प्रा. दिलीप सोनवणे, डॉ. बाबुराव उपाध्ये लिखित विविध संतपुस्तके भेट देण्यात आली, त्याबद्दल आनंद व्यक्त करताना ते बोलत होते. डॉ. बाबुराव उपाध्ये .यांनी संतसाहित्य आणि आजची वाचन संस्कृतीविषयी मनोगत व्यक्त केले. तंत्रज्ञान हे भौतिक सुधारणांचे दिशादर्शन करते तर संतसाहित्य संस्कृती आणि मनाचे उन्नयन करणारे आहे, ते जपले पाहिजे, या पवित्र वाटेवर चालणारे संत आणि समर्पित व्यक्तिमत्त्वे पूजनीय आहेत. सत्ता, संपत्ती आणि जीवन हे अळवावरचे पाणी आहे, परंतु संतसाहित्य आणि संतविचार हे युगाचे प्रकाशपर्व आहे, ते जपले तरच अज्ञानाचा अंधार जाईल. यावेळी सौ. मंदाकिनी उपाध्ये, प्रा.सौ.पल्लवी     सैंदोरे, सौ.आरती उपाध्ये यांनी संतपूजन केले. ह.भ.प. बापू महाराज देवतरसे यांनी जीवन आहे तोपर्यंत या देहाचे सार्थक करावे. श्रीकृष्ण हे परिपूर्ण देवरूप असून काला हा जीवनाचा सारअर्थ सांगणारा आहे. संत एकनाथी भारुडे, संत तुकोबांचे अभंग आणि संतांच्या शिव्या,ओव्या यातील मूलतत्व समजून घेतले तरच संतांचे सांगणे लक्षात येईल. त्यासाठी संतसाहित्य समजून घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगून मी अध्यात्म मार्गात संतसहवास घेतो आणि समाधानी होतो. या वाटेवर मी छोटा आहे, शिकतो आहे, संतांचे आशीर्वाद घेतो आहे, हेच जीवनाचे सार्थक वाटते असे सांगून वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.

COMMENTS