Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेट्रिमोनियल साईटवरून तब्बल 22 मुलींची फसवणूक

7 तरुणींना लग्न करून गंडवले, आरोपीला अटक

मुंबई : ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांत वाढ होत असतांना आता मेट्रिमोनियल साईटवरून मुलींशी ओळख करून त्यांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करणार्‍या एका भा

केदारनाथ मार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू
पंतप्रधानांसोबत सकारात्मक चर्चा ; मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सावेडीत अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त शोभायात्रा संपन्न 

मुंबई : ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांत वाढ होत असतांना आता मेट्रिमोनियल साईटवरून मुलींशी ओळख करून त्यांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करणार्‍या एका भामट्याला मुंबई पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या आरोपीने तब्बल 22 मुलींची आर्थिक फसवणूक तर 7 मुलींची लग्न करून त्यांना लाखो रुपयांनी गंडवल्याचे उघड झाले आहे. त्याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची देखील माहिती आहे.
इम्रानअली खान असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा हैदराबाद येथील रहिवासी आहे. त्याने सोलापूर, मुंबई, परभणी, धुळे, कोलकाता, लखनऊ येथील अनेक तरुणींशी मेट्रिमोनियल साईटवरून ओळख करत त्यांना फसवले आहे. त्याने सात तरुणींशी लग्न केले असून त्यांना लाखो रुपयांनी फसवले आहे. या प्रकरणी एका 42 वर्षीय महिलेने पोलीसांत तक्रार दिली होती. त्यानुसार या आरोपीच्या शोधात पोलिस होते. मुंबई पोलिसांनी आरोपीला हैदराबादमध्ये जाऊन अटक केली आहे. त्याच्या चौकशीत त्याने अनेक तरुणींची फसवणूक केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 42 वर्षीय महिलेने 2023 मध्ये मेट्रिमोनियल साईटवर तिची माहिती दिली होती. याच साईटवरून काही मुलांची नावे वेगळी करून या महिलेला त्यांची माहिती देण्यात आली होती. यावेळी हैदराबाद येथील इम्रानअली खान याचेही या यादीत नाव होते. या महिलेने आरोपी इम्रानशी संपर्क साधला. यावेळी इम्रानने तो बांधकाम व्यवसायात कार्यरत असल्याची बतावणी केली. दरम्यान, इम्रानने तक्रारदार महिलेला त्याच्या जाळ्यात फसवले व लग्न करण्याचे आमिष दाखवले.

दरम्यान, इम्रानने 10 मे 2023 रोजी तिला फोन करत मित्रांना दोघांबाबत सांगितले आहे. त्यामुळे त्यांना आता तुझ्याकडून पार्टी हवी आहे. असे सांगून इम्रानने तक्रारदर महिलेकडून एक हजार रुपये ऑनलाइन मागवून घेतले. काही दिवसांनी तक्रारदार महिलेने इम्रानला आईला भेटण्यासाठी मुंबईत येण्यास सांगितले. मात्र, त्याने त्याचे पैसे काही ठिकाणी अडकले असल्याची बतावणी करून मुंबईत येण्यासाठी 10 हजार रुपये देण्याची मागणी केली. तक्रारदार महिलेने त्याला पैसे दिले. मुंबईत आल्यावर काही दिवसांनी आरोपीने महिलेकडून भायखळा येथे एक भूखंड खरेदी करण्याचे कारण देत 15 लाख रुपये घेतले. यानंतर वन विभागाची जमीन खरेदी केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केल्याचे कारण देत जामिन घेण्यासाठी व इतर गोष्टींसाठी आरोपीने आणखी पैसे महिलेकडून उकळले. तब्बल 21 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक त्याने तक्रारदार महिलेची केली. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. यानंतर पोलिस आरोपीचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याला हैद्राबाद येथून अटक केली. यावेळीत्याची चौकशी केली, त्याने मुंबईतील 10 ते 12 मुलींसह सोलापुर, धुळे, परभणी, येथील महिलांची फसवणूक केल्याचा संशय आहे.

COMMENTS