Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माढ्यात पैसे वाटपावरून मारामारी

वाई : लोकसभेची रणधुमाळी सुरू असतांनाच सोमवारी माढ्यात पैसे वाटपावरून चांगलीच मारामारी झाल्याचे समोर आले आहे. उत्तर कोरेगाव तालुक्यात पिंपोडे येथे

अण्णा महाराज आहेर यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस
जळगावातील अपघातात तिघांचा मृत्यू
ईडीने केली 25 कोटींची मालमत्ता जप्त

वाई : लोकसभेची रणधुमाळी सुरू असतांनाच सोमवारी माढ्यात पैसे वाटपावरून चांगलीच मारामारी झाल्याचे समोर आले आहे. उत्तर कोरेगाव तालुक्यात पिंपोडे येथे काही लोक पैसे वाटत असल्याचे निदर्शनास आले. याला महाआघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकांनी विरोध केला असता दोन्हीकडून तुंबळ मारामारी झाली. या प्रकारानंतर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी शहा नामक व्यक्ती पैसे वाटत असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. त्यांच्या सोबत काही लोक होते. दरम्यान, ढमाळ नामक व्यक्तीसह अन्य चार लोकांमध्ये मारामारी झाली. यानंतर काही लोक पैसे घेऊन पळाल्याचे अनेकांनी सांगितले.

COMMENTS