Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुंतवणुकीचे आमिष दाखवून 39 लाखांची फसवणूक

पुणे ः शेअर बाजारात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने फसवणूक करण्याचे घटना दिवसेंदिवस वाढत असून, सायबर चोरट्यांनी दोन महिलांसह 3 जणांची 39 लाख रुपयांची

शेअर मार्केट मधील ब्रोकरने घातला 15 लाखांचा गंडा
एटीएम कार्ड बदली करून 16 हजारांची फसवणूक
दहा द्राक्ष बागायतदारांना जयपूरच्या व्यापाऱ्याकडून गंडा 

पुणे ः शेअर बाजारात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने फसवणूक करण्याचे घटना दिवसेंदिवस वाढत असून, सायबर चोरट्यांनी दोन महिलांसह 3 जणांची 39 लाख रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत बाणेर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तावरे यांच्या मोबाइलवर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. चोरट्यांनी त्यांना एक पमध्ये माहिती भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी 24 लाख 80 हजार रुपये चोरट्यांच्या बँक खात्यात जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला. सायबर चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. तेव्हा त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक युवराज नांद्रे तपास करत आहेत. धनकवडी भागातील एका महिलेची चोरट्यांनी फसवणूक केली. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या आमिषाने चोरट्यांनी महिलेकडून 10 लाख 31 हजार रुपये घेतले. महिलेला परतावा न मिळाल्याने तिने पोलिसांकडे तक्रार दिली. याबाबत महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत. अशाच पद्धतीने चोरट्यांनी लोणी काळभोर भागातील एका महिलेची 3 लाख 41 हजार रुपयांची फसवणूक केली. महिलेने याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण तपास करत आहेत.

COMMENTS