Homeताज्या बातम्यासंपादकीय

तिसरी फेरी निर्णायक !

 देशात आणि महाराष्ट्रातही तिसऱ्या फेरीच्या मतदानाला आज प्रारंभ झाला. संध्याकाळी मतदान संपेपर्यंत किती टक्के मतदान होईल, त्याची आकडेवारी निवडणूक आ

पत्रकारावर हल्ला आणि समाज माध्यमातून मतभेद! 
एलन मस्क भांडवलदार विरोधी ?
वेगळा आणि विरळा अभिवादक! 

 देशात आणि महाराष्ट्रातही तिसऱ्या फेरीच्या मतदानाला आज प्रारंभ झाला. संध्याकाळी मतदान संपेपर्यंत किती टक्के मतदान होईल, त्याची आकडेवारी निवडणूक आयोग यावेळी लगोलग जाहीर करणार असल्याचेही, त्यांनी यापूर्वीच म्हटले आहे. परंतु, प्रत्यक्षात देशात होणाऱ्या एकूण ९४ जागांसाठी हे मतदान नेमक्या कोणत्या कलाने जाईल, हे पाहता देशातील सर्व विरोधी पक्ष, आता इंडिया आघाडी ही अधिक जागांवर यशस्वी राहील, असाच अंदाज व्यक्त करते आहे. अर्थात, महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील मोदींच्या संदर्भात टीका करत, त्यांचा पराभव होणार असे म्हटले आहे. कालच झी टीव्हीचे संस्थापक सुभाष चंद्र गोयल यांनी आपले चॅनल, माध्यमांचे स्वातंत्र्य अधिक जपण्याचा आता यापुढे प्रयत्न करेल आणि त्यातूनच त्यांनी वर्तमान सत्ताधार्यांना चॅनलच्या एकूण प्रसारणातून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या बाबी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा कल नेमका कोणत्या दिशेने जातो आहे, हे दर्शविणारे आहेत. तरीही, आपण देशाच्या एकूण जागांकडे न पाहता महाराष्ट्रात ज्या अकरा जागांसाठी मतदान होत आहे, त्यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, बीड, बारामती सांगली, सातारा, आदी मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांमध्ये दोन जागा वगळल्या तर नऊ जागांवर महाविकास आघाडी अधिक ताकदीने फाईट करत असल्याचा अंदाज विश्लेषक व्यक्त करत आहेत.

अंदाज आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये फरक असला तरीही,  बहुसंख्य विश्लेषक जेव्हा, या संदर्भातला अंदाज सांगतात तेव्हा त्यामध्ये निश्चितपणे काही तथ्य असतं. हीच तथ्य जर आपण पाहिली, तर, निवडणूक विश्लेषणाची तर त्यातून आजच्या मतदानात महाविकास आघाडीचे पारडे अधिक जड  असल्याचे दिसते. देशातील ९४ जागांवर मतदान होत असले तरी, यापैकी बहुतेक जागा या इंडिया आघाडीच्या बाजूने झुकलेल्या आहेत, असा कयास भारतातील अनेक विश्लेषक मानत आहेत. एकंदरीत तिसऱ्या फेरीपर्यंतही मोदी लाट प्रभावी दिसत नाही, असेच तज्ञांचे मत आहे. आजच्या तिसऱ्या फेरीतील मतदानाच्या कलानंतर संध्याकाळी देशभरातील जवळपास सर्वच राजकीय विश्लेषक हे सांगायला लागतील की, देशाची राजकीय सत्ता नेमकी कोणत्या बाजूला झुकणारी आहे! कारण, यापूर्वी जवळपास १९० जागांसाठी मतदान झाले आहे; आता या ९४ जागा म्हणजे जवळपास ३०० जागांचा स्पष्ट होऊन ४ जून रोजी काय निकाल येईल याचा अंदाज अधिक स्पष्टपणे वर्तवण्याचा प्रयत्न राजकीय विश्लेषक करतील. पण, एकंदरीत हवा मात्र बदलाची आहे हे काल झी टीव्ही चे संस्थापक सुभाषचंद्र गोयल यांनी दीर्घकाळानंतर माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केल्यावरून  जाणवते. देश भरातील राजकीय विश्लेषकांच्या भूमिकेतूनही जाणवते. अर्थात, इंडिया आघाडीने लोकसभा २०२४ च्या निवडणुका बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक प्रश्न यापासून जराही हटू दिली नाही. त्याचा परिणाम या लोकसभा निवडणुकीत जनता पुन्हा एकदा निवडणुकीत निवडणुकीच्या नेतृत्व स्थानी आल्याचे दिसते. याचाच अर्थ ही निवडणूक कोणत्याही राजकीय नेत्याच्या दिशा दर्शनावर नसून, जनतेच्या भूमिकेवरच होत असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे आगामी काळ हा जनतेच्या राजकीय भूमिकांचाच नव्हे तर जनतेला आवश्यक असणाऱ्या आणि छळत असणाऱ्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी येणाऱ्या नव्या सत्तेला वजनबद्ध राहावं लागेल, हे दर्शवणारा आहे!

COMMENTS