कोपरगाव शहर: कोपरगाव सब जैल मध्ये कैद्यांनी घातला राडा सहा कैद्यांनी मिळून एका कैद्याला शिवीगाळ करत मारहाण करून दुखापत करत जीवे मारण्याची धमकी दि

कोपरगाव शहर: कोपरगाव सब जैल मध्ये कैद्यांनी घातला राडा सहा कैद्यांनी मिळून एका कैद्याला शिवीगाळ करत मारहाण करून दुखापत करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना उघडकीस झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगांव सबजेल मध्ये दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास फिर्यादी हा कोपरगाव पोलीस स्टेशन गु.र.न 209/24 क्र.328,188,272,273 34 भादवी ,मध्ये अटक असून त्यास कोपरगांव येथील सबजेल मध्ये ब्यरीकेट क्रमांक 4 मध्ये ठेवले होते. त्यावेळी आरोपी आकाश माकोने याने विनाकारण फिर्यादी दानिश शेरखा पठाण यास शिवीगाळ करत धक्का दिला असता फिर्यादी याने याची विचारणा केली असता इतर आरोपी यांनी फिर्यादिस लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व आरोपी भैय्या उर्फ नयन शिंदे याने झाडूने फिर्यादीच्या हातावर, पायावर, पाठीवर, मारत दुखापत केली त्याच बरोबर आरोपी विशाल कोते याने कात्रीने फिर्यादीच्या अंगावर दुखापत करत जीवे मारण्याची धमकी दिली तर भारत आव्हाड, अतुल आव्हाड आकाश माकोने यांनी देखील मारहाण केली असता फिर्यादी याने कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित आरोपींन विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्या संदर्भात पुढील तपास शहर पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा हे करत आहेत.
कैद्यांवर गुन्हा दाखल – आरोपी क्रमांक 1) भैय्या उर्फ नयन शिंदे,2) भारत आव्हाड,3) अतुल आव्हाड 4) आकाश माकोने 5) विकी शिंदे 6) विशाल कोते या कैद्यांवर फिर्यादी दानिश शेरखा पठाण याच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS