Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चौदा बालकांची विक्री करणार्‍या टोळी जेरबंद

एका डॉक्टरसह 7 जणांना मुंबई पोलिसांनी केली अटक

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि पुणे व पिंपरी चिंचवड परिसरामध्ये लहान बालकं बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले होते. विशेष म्हणजे यामध्य

 राहाता तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा
उद्या सकाळी 10 वाजता हायड्रोजन बॉम्ब फोडणार-मलिक (Video)
पक्षांतर्गत बंडाळी रोखण्याचे आव्हान !

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि पुणे व पिंपरी चिंचवड परिसरामध्ये लहान बालकं बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले होते. विशेष म्हणजे यामध्ये हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांचा हात असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. अशाच एका लहान बालकांची विक्री करणार्‍या टोळीचा मुंबई पोलिसांनी रविवारी पर्दाफाश केला आहे. या टोळीत एका डॉक्टरचा समावेश असल्याचे समोर आले आहे. प्रसुती केंद्रात काम करणार्‍या महिलांच्या मदतीने रॅकेट चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या टोळीने आतापर्यंत 14 बालकांची विक्री केल्याचे तपासात उघड झाल्याने मुंबईमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीमध्ये डॉ. संजय सोपानराव खंदारे याचा दिवामध्ये दवाखाना आहे. मुळचा नांदेडचा रहिवासी असणारा हा डॉक्टर या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. पोलिस उपायुक्त रागासुधा आर. म्हणाले की, कदाचित या डॉक्टरकडे लहान मुलांचे हे पालक गेले असावेत. तिथे त्यांचा संपर्क झाला असावा असा आमचा संशय आहे. तेलंगणा आणि हैदराबादमधून खास करून बाळांच्या खरेदीची डिमांड असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर पोलिसांनी या डॉक्टरसह आरोपींना बेडया ठोकल्या आहे. बालकांची विक्री करणार्‍या महिला दलालासह एकूण 7 आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. तर तिघांची सखोल चौकशी केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वंदना अमित पवार, शितल गणेश वारे, स्नेहा सूर्यवंशी, नसीमा खान, लता सुरवाडे, शरद देवर आणि डॉ. संजय सोपानराव खंदारे यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बालकांची विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दुसरे म्हणजे आरोपींकडून आतापर्यंत लहान बाळांमध्ये 11 मुले आहेत, तर तीन मुली अशा एकूण 14 जणांची विक्री करण्यात आलेली आहे. पोलिस उपायुक्त रागासुधा आर. यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सदर आरोपींमध्ये एका बीएचएमएस डॉक्टरला देखील बेड्या ठोकल्या आहेत. तर प्रसुती केंद्रामध्ये काम करणार्‍या महिलांच्या मदतीने रॅकेट चालवले जात असल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले.

दोन बाळांची सुखरूप सुटका – पोलिसांनी एका डॉक्टरसह इतर आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर तपासात आतापर्यंत तब्बल 14 लहान बालकांची विक्री झाल्याचे समोर आले आहे. तसेच पोलिसांनी 2 बाळांची सुखरुप सुटका करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. अटकेतील आरोपी मुंबईमधील काही हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत. बालक विक्री प्रकरणात काही हॉस्पिटल देखील मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यामुळे बाळांची चोरी करणार्‍या आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

COMMENTS