Homeताज्या बातम्यादेश

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर ः जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच असून, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा दलांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आल

‘टीम इंडिया’ला धक्का; शुभमन गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह
अश्‍लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश l DAINIK LOKMNTHAN
महिन्यानंतर पुन्हा कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का

श्रीनगर ः जम्मू-काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच असून, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा दलांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी उत्तर काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. यावेळी एका नागरिकाच्या खांद्यावर गोळी लागली. त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, तेथून त्याला श्रीनगरला रेफर करण्यात आले.
नौपोरा भागात एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. सुरक्षा दलांनी तेथे नाकाबंदी केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला आणि तेथे चकमक सुरू झाली. गुरुवारी रात्री अंधार पडल्याने कारवाई थांबवण्यात आली. शुक्रवारी सकाळी पुन्हा गोळीबार सुरू झाला, ज्यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. लष्कराचा डिव्हिजनल कमांडर उस्मान आणि लष्कराच्या संघटनेचा टीआरएफ कमांडर बासित दार तेथे अडकल्याची माहिती मिळाली होती.

COMMENTS