Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हे साखर कारखान्याचे वतीने साखर आयुक्तांचा सत्कार

कोपरगाव तालुका ः येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि., सहजानंदनगर या कारखान्याचे चेअरमन, विवेक कोल्हे व संजीवनी उद्योग समुहा

निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी मराठा आरक्षणाला दिला पाठिंबा
काकडे कुटुंबियांकडून यशस्वी उद्योजकांचा सन्मान
हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या  तरुणीचा पाठलाग करुन विनयभंग

कोपरगाव तालुका ः येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि., सहजानंदनगर या कारखान्याचे चेअरमन, विवेक कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे वतीने महाराष्ट्र राज्याचे नुतन साखर आयुक्त डॉ. कुणालजी खेमनर यांना प्रत्यक्ष भेटून कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार यांनी त्यांचा सत्कार केला. डॉ. कुणालजी खेमनर हे 2012 चे यु.पी.एस.सी.बॅचचे आय.ए.एस. ऑफीसर असून त्यांनी यापूर्वी कोल्हापूर व चंद्रपुर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच साखर आयुक्त म्हणून नियुक्त होण्यापूर्वी त्यांनी पूणे महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून जवळपास 4 वर्षापासून काम पाहिलेले आहे.
             सदर सत्काराप्रसंगी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे साखर, आसवणी प्रकल्प, कंट्रीलिकर विभाग तसेच अ‍ॅसेटीक अ‍ॅसीड, अ‍ॅसेटीक अनहैड्राईड व इथाईल अ‍ॅसीटेट या प्लॅन्टची संपूर्ण माहिती दिली.  विद्यमान चेअरमन, युवा नेते विवेक कोल्हे  यांनी गेल्या दोन वर्षात चेअरमन पदाची धुरा स्विकारल्यापासून नवनवीन संकल्पना व प्रकल्प अस्तित्वात येत असल्याची माहिती त्यांना दिली. युवा चेअरमन यांच्या संकल्पनेतुन पेपरलेस ऑफीस, ई. आर. पी. इम्प्लिमेंटेशन, बायो-सी.एन.जी., एम.ई.ई. प्रकल्प, स्प्रे ड्रायर, बायो अ‍ॅसेटीक अ‍ॅसीड इत्यादी नवीन प्रकल्प लवकरच पुर्णत्वास येत असल्याची माहिती दिली. जवळपास अर्धा तास शुगर इंडस्ट्रीमधील व खाजगी कारखान्यांची कामकाजाची माहिती डॉ. खेमनर यांनी घेतली तसेच ऊस उत्पादन वाढ, खोडवा व्यवस्थापन व देशीमद्य विक्रीचा महसुल वाढविण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील यावर साधक बाधक चर्चा होऊन राज्यातील साखर उद्योगापुढील आव्हाने व त्यावरील उपाय याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. एकुणच एक तरुण साखर आयुक्त म्हणून महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखान्यांकडून डॉ. कुणालजी खेमनर  यांच्याकडून धडाडीचे निर्णय व गतिमान प्रशासन होईल याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS