गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उष्णतेची लाट असून, तापमान 44-45 अंशाच्या घरात पोहचले आहे. तर दुसरीकडे राज्यात आगीच्या दुर्घटना देखील मोठ्या
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उष्णतेची लाट असून, तापमान 44-45 अंशाच्या घरात पोहचले आहे. तर दुसरीकडे राज्यात आगीच्या दुर्घटना देखील मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेषत उन्हाळ्यात मुंबईसह देशातील अनेक राज्यांमध्ये आगीच्या दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. जळगावमध्ये दोन केमिकल कंपन्यांना आग लागल्यामुळे दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक कामगार जखमी आहेत. जळगावसोबतच काही दिवसांपूर्वी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, जळगाव तसेच इतर ठिकाणी भीषण आग लागल्याच्या घटना घडल्या. यात काही ठिकाणी वित्तहानीबरोबरच मनुष्यहानीही झाली. आगीच्या घटना रोखण्यासाठी पुरेशा प्रमाणात खबरदारी घेणे गरजेचे आहे. देशभरात सूर्य आग ओकतांना दिसून येत आहे. तापमानाचा पारा 45 अंशाच्या घरात पोहचला आहे. अशावेळी पुरेशी खबरदारी घेऊन आगीच्या दुर्घटना घडणार नाही, याची पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे. आगीच्या दुर्घटनेमुळे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतांना दिसून येत आहे. त्याचबरोबर जीवित हानी देखील होत आहे. त्यातच ऐन उन्हाळा असल्यामुळे या आगीच्या दुर्घटना तात्काळ रोखता येत नाही.
परिणामी यातून मोठ्या प्रमाणात नुकसान होतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे या आगीच्या दुर्घटना रहीवासी इमारती, कार्यालये, कारखाने, वाहने, रुग्णालयांना लागल्या होत्या. प्रामुख्याने उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटनांचे मूळ कारण हे इलेक्ट्रॉनिक वस्तूंशी संबंधित आहे. उन्हाळ्याच्या दिवसात घराघरात एसी, पंखे, कूलर यासारख्या इलेक्ट्रीक वस्तुंचा अतिवापर केला जातो. यामुळे मशीनवर ताण येतो. यातून मग विजेच्या तारेतून ठिणकी म्हणजे स्पार्कींग होते, कधी शॉर्ट सर्किट होते यामुळे आग लागण्याचा धोका अधिक वाढतो. गेल्या काही दिवसात घडलेल्या आगीच्या घटनांमागचे कारण यातीलच एक आहे. एप्रिल महिन्यात मुंबई, जळगावसह इतर जिल्ह्यात आग लागण्याच्या घटनांत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता दरवर्षी तापमान वाढीमुळे आणि वाढत्या उष्म्यामुळे आग लागण्याच्या घटनांत वाढ होतांना दिसून येत आहे. यामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होतांना दिसून येत आहे. उन्हाचा पारा वाढळल्यामुळे गाड्यांच्या पेट्रोल, गॅस टाकी व बॅटर्या अधिक गरम होऊन स्फोट होण्याचा धोका असतो.
गाडीमधील सॅनिटायझर, परफ्युममधील गॅस ज्वलनशिल असल्यामुळे ते गरम होऊन त्याचा स्फोट होऊ शकतो. गाडीमध्ये डॅशबोर्डवर ठेवलेल्या पाणी बॉटलमधुन तीव्र उन्हाची किरणे परावर्तीत होऊन गाडीला आग लागण्याचा धोका असतो. शेत व शेतात असलेल्या गंजींमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे मिथेन वायु तयार होतो. हा वायु ज्वलनशिल असल्यामुळे गंजीला आग लागण्याचे प्रमाण वाढते. यासोबतच आग लागण्यामागे शॉर्ट सर्किट हे प्रमुख कारण असले तरी उन्हाळ्यामध्ये आगीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास गंभीर घटना टाळता येणे शक्य आहे. स्लॅब आणि पत्र्याची घरे उन्हामुळे तापतात. उन्हाळ्यात गारव्यासाठी प्रत्येक घरात पंखे, एसी किंवा कूलरचा वापर वाढतो. यामुळे वीज यंत्रणेवर लोड वाढतो. विद्युत उपकरणे जास्त वेळ सुरू ठेवल्यामुळे यंत्र व विद्युत वायरींग अति गरम होऊन शॉर्टसर्किट होते. यामुळे इमारती, घर, कारखाने, गोडगऊनला आग लागण्याच्या घटना घडतात. गॅसगळती किंवा अन्य चुकीमुळे कागद, प्लॅस्टिकचे साहित्य, रसायने आणि फर्निचर पेट घेऊन आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे या संपूर्ण बाबींची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे, अन्यथा आगीच्या दुर्घटना थांबवणे अवघड होईल, आणि यातून होणारी जीवित आणि वित्त हानी थांबवणे अशक्य होईल, त्यापूर्वीच उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
COMMENTS