Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुढील 15 दिवसांत स्वगृही परतणार ः एकनाथ खडसे

पक्षप्रवेश राजधानीत होणार असल्याची दिली माहिती

जळगाव ः गेल्या चार दशकांकपासून अधिक काळ भाजपमध्ये असलेले ज्येष्ठ नेते मध्यतंरीच्या काळात आपल्यावर पक्षातील नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन य

फडणवीसांनी राज्यपालपदाची ऑफर दिली होती
अखेर एकनाथ खडसे स्वगृही परतण्याचे संकेत !
जळगावात एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादीला मोठा धक्का

जळगाव ः गेल्या चार दशकांकपासून अधिक काळ भाजपमध्ये असलेले ज्येष्ठ नेते मध्यतंरीच्या काळात आपल्यावर पक्षातील नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर टीका करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र खडसे यांनी साडेतीन वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजपमध्ये परतणार असल्याचे संकेत रविवारी पत्रकार परिषद घेऊन दिले आहेत.
राजधानीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करून एकनाथ खडसे रविवारी त्यांच्या मतदारसंघात परतले आहेत. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, आपण लवकरच येत्या पंधरा दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. कोणत्याही अटीशर्थीशिवाय मी प्रवेश करणार आहे. भाजप हे माझे घर आहे. पक्षाच्या पायाधरणीपासून मी भाजपमध्ये राहिलो आहे. भाजपमध्ये माझे योगदान राहिले होतो. चाळीस वर्षे मी भाजपमध्ये होतो. काही नाराजीमुळे मी बाहेर पडलो होतो. मात्र आता माझी नाराजी कमी झाल्याने मी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करत आहे. भाजपमध्ये येण्याचे माझा प्रयत्न नव्हता. पण भाजपमधील जे जुने कार्यकर्ते आणि नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करत असताना ते म्हणायचे की तुम्ही भाजपत असायला हवे होते. तुम्ही आलात तर बरे होईल. हे काही आता सुरू झालेले नाही. गेल्या चार सहा महिन्यांपासून अशी चर्चा सुरू होती. परंतु, माझ्या राजकीय परिस्थितीनुसार मी निर्णय घेऊ शकत नव्हतो. आता केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करून ते सांगतील त्या तारखेला मी दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करणार असल्याचे खडसे यांनी सांगितल्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश लवकरच होणार असल्याचे दिसून येत आहे.  
भाजपशी 40 वर्षे एकनिष्ठ राहिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी 23 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पक्षांतर्गत वाद, भोसरी भूखंड घोटाळा, देवेंद्र फडणवीसांशी मतभेद आदी विविध मुद्द्यांवरून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. 2020 मध्ये राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना तत्काळ नेतेपदी विराजमान करण्यात आले. तेव्हापासूनच त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली. बुथवर जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या होत्या. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत राज्यात अनेक राजकीय उलथापालथ झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्याने राजकीय गणिते बदलली. त्यामुळे उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे.

जळगाव, रावेरमध्ये राजकीय गणिते बदलणार – भाजपने रावेरमध्ये रक्षा खडसे यांना तर जळगावमध्ये उन्मेष पाटील यांना डावलत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र एकनाथ खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असल्यामुळे आणि उन्मेष पाटील ठाकरे गटात गेल्यामुळे भाजपच्या दोन्ही जागा अडचणीत होत्या. त्याची दखल थेट केंद्रीय नेतृत्वाने घेत खडसे यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी पावले उचचली. आणि खडसे यांनादेखील भविष्यातील राजकीय गणिते आणि चौकशीचे शुक्लकाष्ट बघता भाजपमध्ये परतण्याचे वेध लागले होते, ते यानिमित्ताने पूर्ण होणार असल्याचे दिसून येत आहे. शिवाय भाजपला यानिमित्ताने जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात बळ मिळणार असल्याचे दिसून येत आहे.

खडसेंच्या पक्षप्रवेशाला फडणवीसांचा विरोध नाही ः बावनकुळे – एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर बोलतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाकडे पाहून पक्ष प्रवेश होत आहेत. मोदी यांच्या विकसित भारत संकल्पासाठी भाजपमध्ये यावे, असे कोणाला वाटत असेल तर त्याचे स्वागच आहे, असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, लातूरच्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांचाही मोदी यांच्या नेतृत्वात काम करण्याच्या भूमिकेतून पक्षप्रवेश झाला आहे. खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही विरोध नाही, असे बावनकुळे म्हणाले.

COMMENTS