श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : स्पर्धा परीक्षेतून मोठ्या पदावर सेवा करण्याची हुशार विद्यार्थ्यांची ईच्छा असते मेहनतीतून ते यश मिळवतात पण प्रत्यक्ष सेव
श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : स्पर्धा परीक्षेतून मोठ्या पदावर सेवा करण्याची हुशार विद्यार्थ्यांची ईच्छा असते मेहनतीतून ते यश मिळवतात पण प्रत्यक्ष सेवा करताना जबाबदारी, ताण तणाव याचा सामना करण्याबाबत मार्गदर्शन मिळत नसल्याने यावर उपाय म्हणुन राज्य सेवेत रुजू होणार्या तालुक्यांतील गुणवंत अधिकार्यांना प्रशासकीय सेवेत उत्तम कामातून ठसा उमटवणार्या अधिकार्यांचे मार्गदर्शन आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन श्रीगोंदा येथे वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चेअरमन विठ्ठल राव वाडगे यांच्या पुढाकारातून चैतन्य बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थे वतीने करण्यात आला.
वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटीच्या चैतन्य सभागृहात हा सोहळा गुणवंत अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात भुवनेश्वर येथील ओरिसा मिल्क फेडरेशनचे कार्यकारी संचालक विजय कुलांगे यांनी बोलताना रुजू होणार्या अधिकार्यांनी पसंतीचे ठिकाण शोधू नये गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात देखिल मनापासून सेवा करावी काम करताना जनहित, कायद्याची चौकट आणि समाधान मिळेल याची दक्षता घ्यावी असे सांगून कुलांगे म्हणाले नविन शिकण्याचा प्रयत्न करावा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालात तर आता केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याची तयारी करावी ईच्छा असेल तर मार्ग निघतो मी शिक्षक असताना दिनकर टेमकर शिक्षण अधिकारी होते त्यांनी मला भेटण्यात मार्गदर्शन करण्यात कधी संकोच आडवा आला नाही असे सांगीतले. तर प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे निवृत्त संचालक दिनकर टेमकर म्हणाले राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा अनेकजन देतात पण यशस्वी फार कमी होतात. आता तुम्ही रुजू होणार यात अनेक समस्या येतील तसेच संधी देखील येतात समस्यावर मात करण्याचे शिकावे लागेल आणि संधीचे रूपांतर चांगल्या कामात करावे लागेल आणि हे सर्व करताना तणाव न घेता काम करण्याची गरज आहे शिवाय कामाच्या व्यापातून वेळ काढून व्यायाम केले तरच विना त्रासाचा कार्यकाळ पूर्ण करता येईल असे सांगून टेमकर यांनी संधी मिळाल्यावर आपण नवनवीन योजना शासनाला सुचवल्या त्यावर अंमलबजावणी झाली याचे समाधान आहे. यावेळी शासकीय सेवेत रुजू होणार्या उपजिल्हाधिकारी किरण वागस्कर, पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर, पोलीस उपअधीक्षक कोमल शिंगाडे, उपशिक्षणाधिकारी अनुक्रमे किरण शिंदे, सुरज वागस्कर, प्रियंका शिंदे, रामदास गुंजाळ, दुय्यम निबंधक तुषार खेतमाळीस, तहसीलदार सागर वाघमारे, नायब तहसीलदार शोभा लगड, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रिती घोरपडे, सहाय्यक मनपा आयुक्त किशोर जेठे, राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक विशाल शितोळे आदींचा दिनकर टेमकर,विजय कुलांगे, विठ्ठलराव वाडगे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्र संचालन अजित साबळे यांनी तर आभारप्रदर्शन व्रुद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटीच्या उपमुख्य कार्यकारी सायली वाडगे यांनी केले. माजी कृषी संचालक दादासाहेब सप्रे,किसन राव आघाव, वांढेकर आदी उपस्थित होते. सोहळा यशस्वी होण्यासाठी संचालक कृष्णा वामन,प्रदीप आठरे यांनी परिश्रम घेतले.
COMMENTS