Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ब्राम्हणगावात जागर लोकशाहीचा महोत्सव उत्साहात

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकर वस्ती येथे जागर लोकशाहीचा हा महोत्सव साजरा करण्यात आला महो

पीएसआय झालेल्या अजय कळसकर यांचा सन्मान
संतसाहित्य आणि तीर्थस्थळे ही मानवी जीवनाची अमृतस्थळे
मंत्रालयात नोकरी लावण्याचे सांगत पाच लाखांची फसवणूक

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकर वस्ती येथे जागर लोकशाहीचा हा महोत्सव साजरा करण्यात आला महोत्सवा अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीचे शपथ घेतले तसेच चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले रांगोळी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना देखील बक्षीस वितरण करण्यात आले मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थिनींनी चलो हम साथ चलेंगे अपना मतदान करेंगे या गीतावरती सुंदर असे नृत्य सादर केले मतदान जनजागृतीच्या प्रभात फेरीमध्ये पालक शिक्षक विद्यार्थी सहभागी झाले होते मतदार राजा जागा हो माझे आई-वडील मतदानाला जाणारच चला चला मतदानाला या अशा घोषणांनी बनकर वस्तीचा परिसर दुमदुमून गेला हम भारत के है मतदाता शंभर टक्के   उत्सव मतदानाचा या उपक्रमांतर्गत परिपाठात सामूहिक गीत गायन घेण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्राचे लेखन करून घेण्यात आले.मतदान जनजागृती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्‍वर वाकचौरे, श्रीमती मनिषा जाधव, महेंद्र निकम या  शिक्षकांनी परिश्रम घेतले.

COMMENTS