मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअपवर धमकी, तपास गुन्हे शाखेकडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअपवर धमकी, तपास गुन्हे शाखेकडे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअपवर आलेल्या एका संदेशात धमकी देण्यात आली आहे.

अवघ्या 17 महिन्यात 3 कोटींचं कर्ज फेडलं, महिलेनं सांगितली पैसे बचतीची ‘आयडियाची कल्पना’!
मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना दुर्दैवी : आदित्य ठाकरे
ओमायक्रॉनमुळे भारतावर येऊ शकते आर्थिक संकट ?

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअपवर आलेल्या एका संदेशात धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा अज्ञात असून त्याच्या विरोधात नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यानुसार या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून चौकशी सुरू आहे.
या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, व्हॉट्सअपवर अनोळखी नंबरवरून मिळालेल्या धमकीत अज्ञात व्यक्तीने काही मागण्या केल्या आहेत. मागण्या मान्य केल्या नाही तर ईडी, सीबीआय किंवा एनआयएची चौकशी मागे लावू, अशी धमकी दिली आहे. असे असले तरी नार्वेकर यांच्याकडे आरोपींनी नेमकी कोणती मागणी केली, याचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअप मेसेज पाठवला. यात आपल्या काही मागण्या पूर्ण करण्यास सांगितले आहे. आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू अशी धमकी या व्यक्तीने दिली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. हा मेसेज करण्यासाठी ज्या नंबरचा वापर झाला आहे तो नंबर कुठल्यातरी अॅप्लिकेशनचा वापर करून घेतलेला आहे, ज्याला व्हर्चुअल नंबर असे देखील म्हणतात. आम्ही मोबाईल कंपन्यांकडे या नंबरविषयी माहिती मागवली आहे. या प्रकरणामागे नेमके कोण आहे याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

COMMENTS