Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईच्या रस्त्यांवर थुंकणे पडणार महागात

मुंबई ः विदेशातील अनेक शहरात रस्त्यावर थुंकणार्‍यांवर कारवाई करण्यात येते, त्यापोटी दंड वसूल करण्यात येतो. महाराष्ट्रातील मुंबई शहरामध्ये देखील आ

हेमंत सोरेन यांना 5 दिवसांची ईडी कोठडी
आधार-पॅनकार्ड लिंक करण्यास मुदतवाढ
विचार धारेने किरण मानेचा कापला गळा | LOKNews24

मुंबई ः विदेशातील अनेक शहरात रस्त्यावर थुंकणार्‍यांवर कारवाई करण्यात येते, त्यापोटी दंड वसूल करण्यात येतो. महाराष्ट्रातील मुंबई शहरामध्ये देखील आता रस्त्यांवर थुंकणे महागात पडणार आहे. कारण  मुंबईतील रस्त्यावर थुंकणार्‍या अथवा कचरा टाकणार्‍यांना आता आर्थिक दंडाला सामोरे जावले लागणार आहे. महापालिकेने अशा लोकांवर नजर ठेवण्यासाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली आहे. हे मार्शल्स रस्त्यांवर थुंकणार्‍या व कचरा टाकणार्‍यांना जागीच दंड ठोठावणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील प्रत्येक पालिका वॉर्डात आता 30 क्लीनअप मार्शल तैनात करण्यात येणार आहे. प्रायोगिक पातळीवर मंगळवारपासून त्याची सुरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत मुंबई पालिकेच्या 24 वॉर्डात सुमारे 720 मार्शल तैनात करून शहर अस्वच्छ करणार्‍यांकडून दंड वसूल करतील. या कारवाईत दंडाची रक्कम कमीत कमी 100, तर जास्तीत जास्त 1 हजार रुपये असेल.

COMMENTS