Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारीतील रोकडोबाबा यात्रा चाळीस वर्षानंतर उत्साहात साजरी

कोपरगाव : तालुक्यातील वारी येथील भरतवाडी परिसरात रंगपंचमीच्या मुहूर्तावर राहुल भाऊ मित्र मंडळाच्यावतीने श्री रोकडोबाबा यांची यात्रा शनिवारी (दि.3

सौरऊर्जा पथदिवे काळाची गरज : मा. नगरसेवक अजिंक्य बोरकर
माळढोक संपवण्यामध्ये अजित पवार, बबनराव पाचपुते मुख्य सूत्रधार
कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सामुहीक प्रयत्नाची गरज : विवेकभैया कोल्हे.

कोपरगाव : तालुक्यातील वारी येथील भरतवाडी परिसरात रंगपंचमीच्या मुहूर्तावर राहुल भाऊ मित्र मंडळाच्यावतीने श्री रोकडोबाबा यांची यात्रा शनिवारी (दि.30 मार्च) उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिराची रंगरंगोटी करून सकाळी शास्त्रोक्त पद्धतीने पूजन व अभिषेक करण्यात आला. यात्रेनिमित्त महिलांसाठी एक दिवसीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
    भरतवाडी परिसरात श्री रोकडोबाबा हे जागृत देवस्थान असून छोटेसे मंदिर आहे. रंगपंचमीच्या मुहूर्तावर पूर्वी रोकडोबाबा यात्रा उत्सव भरवला जात असे, या यात्रेनिमित्त तमाशा, बैलगाडा शर्यत, कुस्त्या यांचे व त्यानंतर रंगपंचमी खेळण्याचे जंगी आयोजन करण्यात येत होते. मात्र; जुनी पिढी कमी होत गेली. तसतशी यात्राही कमी होत जाऊन कालांतराने खंडितच झाली. यात्रा खंडित होण्याचा कालावधी 40 वर्षापेक्षा जास्त असल्याचे जुने जाणते सांगतात. खंडित झालेली यात्रा नव्याने पुन्हा सुरू करायची यासाठी भरतवाडी परिसरातील राहुल भाऊ मित्र मंडळाने पुढाकार घेतला. तमाशा, बैलगाडा शर्यत, कुस्त्या यातून फक्त पुरुषांचेच मनोरंजन होत असते. याउलट यंदाच्या यात्रेनिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचा मित्रमंडळाने निर्णय घेतला. त्यानुसार संगीत खुर्ची, सापसीडी, बॉल पासिंग, बॉल चमचा, रिंगण फुगा, संगीत रिंग, ग्लास पास करणे, रंग मॅच करणे अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमध्ये 200 पेक्षा जास्त महिलांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे प्रत्येक स्पर्धेतील प्रथम विजेत्या महिला स्पर्धकांना पारितोषिक म्हणून साखर, रवा, पोहे, बेसन पीठ, हरभरा डाळ, तांदूळ, शेंगदाणे, चहा पावडर, पापड, प्रत्येकी एक किलो यानुसार एकूण 50 किलोपर्यंत साहित्य वाटप करण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना कपड्याची साबण देण्यात आली. त्यानंतर शिरा, भात, आमटी भाविकांनी आणलेल्या भाकरीचे महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. यात्रा यशस्वीतेसाठी राहुल भाऊ मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS