Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी तालुक्यातील वळणला गावठी कट्टा तर गंगापुरला तलवार बाळगणाऱ्या दोन तरुणांना अटक  

देवळाली प्रवरा प्रतिनिधी -  राहुरी तालुक्यातील वळण येथिल दादासाहेब उर्फ कृष्णा शंकर कुलट हा तरुण कंबरेला गावठी कट्टा बाळगत तर गंगापुर येथे विठ्ठल

कॉपी रोखण्यासाठी शिक्षकच बनले पोलीस
दिलासादायक…यंदा पाणीटंचाई कमी, 3 गावांनाच टँकरने पाणी
डॉ. काळे करणार दर मंगळवारी ज्येष्ठ नागरिकांची मोफत तपासणी

देवळाली प्रवरा प्रतिनिधी –  राहुरी तालुक्यातील वळण येथिल दादासाहेब उर्फ कृष्णा शंकर कुलट हा तरुण कंबरेला गावठी कट्टा बाळगत तर गंगापुर येथे विठ्ठल अशोक जांभुळकर हा तरुण हातात  तलवार घेऊन दहशत करीत आहे.असल्याची माहिती राहुरी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त खबऱ्या मार्फत मिळताच दोन्ही ठिकाणी पोलिस पथके पाठवून दोन्ही तरुणांना गजाआड करण्यात आले. याबाबत पोलिस सुञाकडून समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील वळण येथिल हनुमान मंदिर परिसरात दादासाहेब उर्फ कृष्णा शंकर कुलट वय 25 वर्ष राहणार वळण ता. राहुरी हा कमरेला गावठी कट्टा लावून थांबलेला होता. पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार कृष्णा कुलट यास ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला गावठी कट्टा सापडला. गावठी कट्टयासह ताब्यात घेवून त्याच्या विरोधात राहुरी पोलीस स्टेशन येथे गुरनं. 325/2024 शस्त्र अधिनियम कलम 3/25, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके हे करीत आहेत. 

               गंगापुर ता.राहुरी येथिल गावात विठ्ठल अशोक जांभुळकर हा तरुण हाताता तलवार घेऊन दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाली.पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांना बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन सापळा लावून विठ्ठल अशोक जांभुळकर, वय 22 वर्षे, रा. गंगापूर ता. राहुरी यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याची  अंगझडती घेतली असता त्याच्या शर्ट मध्ये पाठीमागील बाजूस कंबरेला असलेली तलवार ताब्यात घेऊन त्याच्याविरुध्द राहुरी पोस्टे गुरंन 323/2024 शस्त्र अधिनियम  कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो.हे.काँ. सोमनाथ जायभाय हे करीत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर डॉ.बसवराज शिवपुजे आदींच्या  मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय आर.ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पो.हे.काँ. सोमनाथ जायभाय, सुरज गायकवाड, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पो. कॉ. नदीम शेख, प्रमोद ढाकणे, गोवर्धन कदम, सतीश कुऱ्हाडे, सचिन ताजने, रवी पवार,आदिनाथ पाखरे, पोलीस नाईक संतोष दरेकर, सचिन धनाड आदींनी केली आहे. 

तुला गुन्ह्यातुन वाचवतो पण लाखात बोल – राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी हाथी घेतले आहे. परंतू पथकातील एक पोलिस कर्मचारी प्रत्येक गुन्ह्यात पैसे कमाई करण्यासाठी गुन्हेगारांच्या नातलांगाच्या कानाला लागतो. या गुन्ह्यातुन तुमच्या मुलाला वाचवू पण लाखात बोलावे लागेल असे सांगतो.मध्यंतरी विज मोटार चोरीच्या गुन्ह्यात आदीवासी समाजाच्या महिले कडून एक लाख रुपये घेवून तुझ्या भावाला वाचवितो असे सांगितले, एक लाख घेवून हि त्या अदीवासी तरुणावर गुन्हा दाखल केला. लाख रुपये गेले आणि गुन्हा दाखल झाला.चोरीच्या गुन्ह्यात काहीही संबध नसताना केवळ पैशासाठी चांगल्या घरातील तरुणांना गुंतवून पैसे कमविण्याचा या पथकातील एका पोलिस कर्मचाऱ्याने प्रताप चालवले आहे. या सर्व गोष्टी पोलिस निरीक्षकांना माहित असतानाही त्या पोलिस कर्मचाऱ्याच्या प्रतापाला बळ देण्यात येत असल्याने हि पोलिसांची मिली भगत तर नाही ना? अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.

COMMENTS