Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री वृध्देश्‍वर दूध संघाच्या दूध उत्पादकांच्या खात्यावर अनुदान वर्ग

पाथर्डी ः राज्यातील दूध उत्पादकांना दूध दर कमी झाल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला होता. त्यामुळे सातत

अकोल्यात शिवसेना आणि माकपमध्ये वादाची ठिणगी
अर्बन बँकेच्या सोनेतारणात घोळ… ३० पिशव्यांमध्ये सापडले बेन्टेक्सचे दागिनेl पहा LokNews24
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना घरातूनच अभिवादन करा- हिरे

पाथर्डी ः राज्यातील दूध उत्पादकांना दूध दर कमी झाल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला होता. त्यामुळे सातत्याने दूध उत्पादकांना दूध अनुदान मिळावे अशी मागणी दूध उत्पादकांकडून होत होती, यासाठी राज्यभर आंदोलने झाली होती. अखेर राज्य सरकारकडून 11 जानेवारी 2024 ते 10 मार्च 2024 पर्यंत प्रती लिटर 5 रु. या कालावधी करीता दुध उत्पादकांना अनुदान देण्यात येणार आहे. या निकषानुसार अहमदनगर जिल्हयातील सहकारी दूध संघापैकी फक्त श्री वृध्देश्‍वर सहकारी तालुका दुध संघ यांनी पहिल्या दसवडयाकरीता सर्व निकष पुर्ण करुन ऑनलाईन माहिती दुग्ध विकास खात्यांच्या वेबसाईटवर अपलोड केली. हे प्रस्ताव दुग्ध व्यवसाय विकास विभागाने तपासून श्री वृध्देश्‍वर तालुका दूध संघाच्या उत्पादकांना तातडीने ऑनलाईन अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. पात्र दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर सदर अनुदान वर्ग झाले आहे. श्री वृध्देश्‍वर सहकारी तालुका दूध संघ हा स्व. राजीव राजळे यांनी सन 2000 साली स्थापन केला असून आज तो आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या मार्गदर्शनाखााली उत्कृष्ट प्रकारे चालविला जात आहे.
दूध उत्पादकांना अनुदान मिळवून देण्यासाठी श्री वृध्देश्‍वर सहकारी तालुका दूध संघास मार्गदर्शन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचे काम आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांनी केले आहे. अहमदनगर जिल्हयात सर्व सहकारी प्रकल्पापैकी श्री वृध्देश्‍वर सहकारी तालुका दुध संघ हा संघ अनुदान वर्ग होण्यास पात्र झाला आहे.दुध उत्पादकांना प्रती लिटर 5 रु. अनुदान प्राप्त ते होवून ते बँक खात्यात वर्ग झाल्याने दुध उत्पादक शेतकरी समाधानी झाला आहे. या शेतकर्‍यांना आर्थिक अडचणीच्या काळात अनुदान देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेतल्याबद्दल संघाचे संचालक राहुल राजळे यांनी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजयदादा विखे पाटील व आमदार मोनिकाताई राजळे यांचे दुध उत्पादकांच्या व संघाच्या वतीने आभार मानले आहेत.

COMMENTS