Homeताज्या बातम्यादेश

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात शंभर रूपयांची कपात

पंतप्रधान मोदींची महिला दिनानिमित्त भेट

नवी दिल्ली ः गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होत होती. मात्र शुक्रवारी जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी या

दहशतवाद्यांच्या गोळीबारात जवान शहीद
विमानतळ आंदोलनप्रकरणी आमदार, महापौरांवर गुन्हे
नामांकनाच्या पहिल्या दिवशी आमदार संजय गायकवाड यांनी भरला अर्ज 

नवी दिल्ली ः गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होत होती. मात्र शुक्रवारी जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची कपात करण्याची घोषणा करत महिलांना भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी एक्सवरून ही घोषणा केली.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, आज महिला दिन आहे. त्यामुळे आमच्या सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार काही प्रमाणात हलका होणार आहे. तसेच या निर्णयाचा फायदा नारी शक्तीला होणार आहे. केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या अनुदानात 300 रुपयांची सूट देण्याच्या योजनेला एक वर्षांची वाढ दिली होती. आता मार्च 2025 पर्यंत ही सूट दिली जाणार आहे पंतप्रधान मोदी यांनी आणखी एक ट्विट करत म्हटले की, आम्ही आमच्या नारी शक्तीच्या सामर्थ्याला, धैर्याला सलाम करतो. तसेच महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे कौतुक करतो. आमचे सरकार शिक्षण, उद्योग, कृषी, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात महिलांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचे सक्षमीकरण्यासाठी कटिबद्ध आहोत. या कपातीनंतर आता दिल्लीत किंमत 903 रुपयांवरून 803 रुपये, भोपाळमध्ये 808.50 रुपये, जयपूरमध्ये 806.50 रुपये आणि पटनामध्ये 901 रुपये झाली आहे.

COMMENTS