नाशिक प्रतिनिधी - कृषी, फलोत्पादन आणि कृषी संलग्न क्षेत्रात आपल्या उपक्रमशीलतेच्या जोरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना शासन
नाशिक प्रतिनिधी – कृषी, फलोत्पादन आणि कृषी संलग्न क्षेत्रात आपल्या उपक्रमशीलतेच्या जोरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना शासनाच्या वतीने दिले जाणारे विविध पुरस्कार शासनाने जाहीर केले आहेत. २०२०, २०२१ आणि २०२२ अशा सलग तीन वर्षांचे ९ प्रकारचे विविध पुरस्कार शासनाच्या कृषी विभागातर्फे जाहीर करण्यात आले असून, त्यात तिन्ही वर्षांचे मिळून नाशिक विभागातील ३९ पुरस्कार्थींचा समावेश आहे. यात महिलांची संख्या अवघी ४ इतकी आहे.
२०२० च्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारासाठी नाशिक विभागातून बाळासाहेब मराळे (रा. शहा, ता. सिन्नर) यांची निवड झाली असून २०२१ आणि २०२२ या वर्षात हा पुरस्कार नाशिक विभागाला प्राप्त झालेला नाही. जिजामाता कृषीभूषण पुरस्कार २०२० साठी राजश्री पाटील (रा. हिंगोणे,ता. अमळनेर) यांना जाहीर झाला असून, २०२१ चा हा पुरस्कार पूनम डोखळे (रा. खेडगाव, ता. दिंडोरी) आणि सीमा पाटील (रा. पिंपरी बुद्रुक, ता. चाळीसगाव) यांना विभागून मिळाला आहे. २०२२ साठीचा हा पुरस्कार लक्ष्मी मोरे (रा. चौंधाने, ता. सटाणा) यांना जाहीर झाला आहे.
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार २०२०- रवींद्र पवार (सातमाने, ता. मालेगाव), २०२१-सुरेश कळमकर (मोहाडी, ता. दिंडोरी), २०२२- रवींद्र महाजन (जामनेर) आणि सम्रत राऊत (खोरीपाडा, ता. दिंडोरी)
कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार २०२०- आशीषकुमार पटेल (चाळीसगाव), २०२१-प्रकाश पटेल (चौपाळे,ता. नंदुरबार), २०२२-संदीप जाधव (रा. जोपूळ, ता. चांदवड)
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार-२०२०- मुकुंद पिंगळे (नाशिक), २०२१- नाना पाटील (रा. पिंपरी खुर्द, ता. चाळीसगाव), २०२२-भूषण निकम (पंचवटी)
युवा शेतकरी पुरस्कार २०२०- मल्हार कुंभार (चोरवड, ता. पारोळा), २०२१ – मोहन वाघ (गोरनाळ, ता. जामनेर), २०२२-ओल्या पाडवी (रा. जुनवाणी, ता. अक्कलकुवा) उद्यानपंडित पुरस्कार २०२०- प्रवीण पाटील (राजुरी, ता. पाचोरा), २०२१-जयप्रकाश महाले (ठाणगाव, ता.सुरगाणा), २०२२-धीरसिंग पाडवी (वालंबा, ता. अक्कलकुवा)
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) २०२०- नाशिक- ज्ञानेश्वर गांगुर्डे (दिघवद, ता.चांदवड), २०२१- सुनील भिसे (मोह, ता. सिन्नर), २०२२- दामोदर सानप (ढकांबे)
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषर सेवारत्न पुरस्कार २०२०- विनय बोरसे (तालुका कृषी अधिकारी, शिंदखेडा), २०२१- हितेंद्र पगार (कृषी पर्यवेक्षक, तालुका फळ रोपवाटिका, येवला), २०२२-अनिल भोर (मंडळ कृषी अधिकारी, सुरगाणा)
COMMENTS