Homeताज्या बातम्यादेश

‘मन की बात’ तीन महिन्यांसाठी स्थगित

नवी दिल्ली ः दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणारा ‘मन की बात’ कार्यक्रम पुढील तीन महिने प्रसारित होणार नसल्याची माहिती पंतप्रधान नरेंद

लोहा तालुक्यातील 12 ग्रामपंचायती अंतर्गत 14 रिक्त जागांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर
श्री साई संस्थानच्या 598 कामगारांच्या प्रश्‍नांना प्राधान्य द्यावे
मणिपूरमधील दोघांच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक

नवी दिल्ली ः दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणारा ‘मन की बात’ कार्यक्रम पुढील तीन महिने प्रसारित होणार नसल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लागू होणार्‍या आचारसंहितेमुळे या कार्यक्रमाचे प्रसारण तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात येईल. एप्रिल-मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुका अपेक्षित आहेत. त्यामुळे मार्चपासून आचारसंहिता लागू होईल. याबाबतची घोषणा निवडणूक आयोग पुढील महिन्यात करण्याची शक्यता आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. यानिमित्ताने त्यांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार्‍या युवा वर्गाला मोठया संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

COMMENTS