नाशिक प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी नाशिकमध्ये मोठया प्रमाणात उत्साह असतो. जयंती
नाशिक प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी नाशिकमध्ये मोठया प्रमाणात उत्साह असतो. जयंती साजरी करण्यासाठी महापालिकेतर्फे जाहिरात शुल्क आकारणी करण्यात येते. या शुल्कात माफी मिळावी यासाठी युवासेना आणि शिवसेना पदाधिकात्र्यांनी पालकमंत्र्यांना मागणी केल्याने शुल्क माफ करण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
शिवप्रेमी व आंबेडकर प्रेमी बांधवांच्या भावना लक्षात घेवून पालकमंत्री दादाजी भुसे यांनी हे निर्देश दिले आहेत. यामुळे शहरातील आयोजकांनी पालकमंत्री भुसे यांचे आभार मानले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जयंती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नाशिक महानगरपालिका मंडप शुल्क नाशिक मधील सर्व मंडळांसाठी माफ करावा अशी मागणी शिवसेना व युवासेना पदाधिकार्यांनी पत्राद्वारे नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली होती. शिवजन्मोत्सव व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती हा उत्सव अठरा पगड जातींना एकत्र आणनारा राष्ट्रीय उत्सव आहे. नाशिक मध्येही नाशिककर शिवभक्त हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात, हा संपूर्ण उत्सव सार्वजनिक असल्याने तो सार्वजनिक जागेवरती साजरा केला जातो, नाशिक मधील सर्व शिवजन्मोत्सव मंडळांच्या वतीने हा शिवजन्मोत्सव सोहळा ज्या जागेत साजरा होतो त्याचे भाडे प्रशासनाकडून आकारले जाते ते भाडे माफ करण्यासंदर्भात पालकमंत्री या नात्याने प्रशासनाला आदेश देण्याची विनंती पत्रात करण्यात आली होती. येत्या पुढील काळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले ह्या महापुरुषांच्या देखील जयंतीना हे शुल्क माफ करण्याची विनंती पालकमंत्र्यांना करण्यात आली होती. त्यानूसार हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे व युवासेना महानगरप्रमुख योगेश बेलदार, तसेच रविवार पेठ शिवजन्मोत्सव आयोजन समितीचे सचिन भोसले व पदाकिार्यांच्या पत्रावर शुल्क माफीची मागणी करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक घेत पालकमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.
COMMENTS