Homeताज्या बातम्यादेश

शेतकरी संघटनांकडून आज भारत बंद

नवी दिल्ली ः किमान हमी भावाच्या कायद्यासह अन्य विविध मागण्यांसाठी राजधानी दिल्लीच्या दिशेनं निघालेल्या शेतकरी संघटनांनी आज शुक्रवारी 16 फेब्रुवार

जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्वाचे आहे – कवी माने
महागाईचा तडका ; टोमॅटोने ओलांडली शंभरी
रोजगारक्षम कौशल्य विकसित होणे गरजेचे ः डॉ.सतीश बिडकर

नवी दिल्ली ः किमान हमी भावाच्या कायद्यासह अन्य विविध मागण्यांसाठी राजधानी दिल्लीच्या दिशेनं निघालेल्या शेतकरी संघटनांनी आज शुक्रवारी 16 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे. हा बंद ग्रामीण भारतापुरता मर्यादित असेल. सर्व समविचारी शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन बंदमध्ये सहभागी व्हावे, असं आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे.
सुमारे दीड वर्षापूर्वी शेतकरी संघटनांनी कृषी कायद्याच्या विरोधात संप पुकारला होता. सरकारने काही आश्‍वासने दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला होता. मात्र, त्यातील अनेक आश्‍वासने पूर्ण करण्यात आली नसल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. त्याच मागण्या घेऊन शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. पंजाबमधून निघालेल्या शेकडो शेतकर्‍यांना दिल्लीपासून 200 किलोमीटर अंतरावर अंबालाजवळ हरियाणाला लागून असलेल्या राज्याच्या सीमेवर रोखण्यात आले आहे. शेतकर्‍यांना रोखण्यासाठी भिंतींसह अनेक अडथळे उभारण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी अश्रूधुराचा वापरही सुरू आहे. आंदोलक कोणत्याही परिस्थितीत राजधानी दिल्लीत प्रवेश करू न देण्याचा पोलिसांचा निर्धार आहे. त्यामुळं आता शेतकरी संघटनांनी आता आंदोलन तीव्र करण्याचं ठरवलं आहे. सेंट्रल ट्रेड युनियन आणि संयुक्त किसान मोर्चाने बंदची हाक दिली आहे. ‘दिल्ली चलो’ मोर्चाचे नेतृत्व करणार्‍या संयुक्त किसान मोर्चाने (अराजकीय) सर्व समविचारी शेतकरी संघटनांना भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. शहरी भागात या बंदचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचे समजते. शेतकरी संघटनांच्या देशव्यापी संपामुळे वाहतूक, कृषी कामे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) ग्रामीण कामे, खासगी कार्यालये, गावातील दुकानं आणि ग्रामीण औद्योगिक व सेवा क्षेत्रातील संस्था बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र रुग्णवाहिका कामकाज, वृत्तपत्र वाटप, लग्नसमारंभ, मेडिकल दुकाने, बोर्डाच्या परीक्षेला जाणारे विद्यार्थी आदी आपत्कालीन सेवांवर संपाचा परिणाम होण्याची शक्यता नाही.

COMMENTS